अजितदादा परत या; रोहित पवार यांची भावनिक पोस्ट

टीम ई-सकाळ
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

रोहित पवार यांनी फेसबुक (Facebook) पोस्टमध्ये म्हटले हे की, पवारसाहेबांना कधी खचून जाताना पाहिलेलं नाही.

पुणे : राज्याच्या राजकारणाला काल सकाळी वेगळं वळणं मिळालं. भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याच्या राजकारणातील या धक्कादायक घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नव्हे तर, पवार कुटुंब हादरलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कुटुंब दुभंगल्याचं सोशल मीडियावर म्हटलं होतं. आज, पवार कुटुंबातील पुढच्या पुढीचे नेते आमदार रोहित पवार यांनीही आज, सोशल मीडियावर पोस्ट करून अजित पवार यांना माघारी येण्याचे आवाहन केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा

रोहित पवार यांनी फेसबुक (Facebook) म्हटले हे की, पवारसाहेबांना कधी खचून जाताना पाहिलेलं नाही. पक्ष असेल किंवा कुटुंब पवारसाहेब कायम खंबीर असतात. माझे आजोबा गेल्यानंतर वडील राजेंद्र पवार यांना पवारसाहेबांनीच धीर दिला. त्याचवेळी पवारसाहेब अडचणीत आल्यानंतर त्यांच्यासोबत उभे राहणारे अजितदादा मी पाहिले आहेत. कुटुंब असो किंवा राजकारण खचून जाणं हे पवारसाहेबांच्या डिक्शनरीतच नाही. अजितदादांनी पवारसाहेबांचं सगळं मान्य करावं आणि स्वगृही यावं. सामान्य घरातून पुढं आलेल्या पवारसाहेबांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, देशातील काही शक्ती करत आहेत. अशा वेळी आपण त्यांच्यासोबत रहायला हवं. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल. पण, यात माणसं दूरावू नयेत, असं वाटतं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader rohit pawar emotional facebook post for ajit pawar