मुंबईत शरद पवारांच्या बंगल्याबाहेर पोलिस; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अडवले

टीम ई-सकाळ
Friday, 27 September 2019

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईमध्ये अंमलबजवाणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यलयात हजर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईमध्ये अंमलबजवाणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यलयात हजर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. पण, मुंबईत जातान टोल नाक्यांवर त्यांच्या गाड्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोलिस मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी

  1. शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा
  2. कार्यकर्त्यांना शरद पवारांचे शांतता राखण्याचे आवाहन
  3. कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये ही पवारांची इच्छा : जितेंद्र आव्हाड
  4. सरकार दबावाचे राजकारण करत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
  5. शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त

युती झाली तरी या जागांचं काय?

दबावाच्या राजकारणाचा आरोप
सरकार दबावाचं राजकारण करतंय, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची फळी घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार असल्यामुळे पोलिसांनी ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ईस्टर्न एक्सप्रेसवेवर बंदोबस्त लावला आहे. त्यामुळे ठाणे येथून मुंबईला जाणाऱ्या आनंद नगर चेक नाका येथे वाहनांच्या रंग लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे मंबईतले आणि इतर भागांतून कालच मुंबईत दाखल झालेले कार्यकर्ते सध्या शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्याबाहेर दाखल झाले आहेत. कार्यकर्ते आणि पोलिस बंदोबस्त यामुळे बंगल्याबाहेर मोठी गर्दी असल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader sharad pawar to go at ed office mumbai residence police