जालना बलात्कार प्रकरणानंतर राष्ट्रवादी संतप्त; सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात उद्या भव्य मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

जालना जिल्ह्यातील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 30 ऑगस्टला (उद्या) सकाळी 11 वाजता चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई : जालना जिल्ह्यातील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या (शुक्रवार) सकाळी 11 वाजता चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढला जाणार आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात राहणाऱ्या एका 19 वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबूर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजून सामूहिक बलात्कार केला होता. या पीडितेची महिनाभर मृत्यूशी सुरू असलेली झुंज काल रात्री अखेर संपली. या घटनेला एक महिना उलटल्यानंतरही अद्याप आरोपींना
अटक झालेली नाही.

या घटनेच्या निषेध म्हणून खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी मुंबई विभागीय अध्यक्ष आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलिस ठाणे असा हा भव्य मोर्चा काढला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP March in Mumbai Tomorrow with Leadership of Supriya Sule