विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बदलले, आता 'हे' आहेत नवीन हंगामी अध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाय. अशातच महाविकास आघाडीच्या गोटातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय.

राज्यपालांनी 3 डिसेंबर पर्यंत उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलंय. याच पार्श्वभूमीवर उद्याच बहुमत चाचणी पार पडणार आहे. दरम्यान याआधी निवड झालेल्या कालिदास कोळंबकर यांच्या जागी राष्ट्रवादीचे  जुने जाणते दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिलीप वळसे पाटील हे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून आता कारभार सांभाळणार आहेत.

कालिदास कोळंबकर यांच्या जागी आपलाच हंगामी विधानसभा अध्यक्ष निवडला जावा, या हालचाली सुरु होत्या. या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल काही नावं सुचवण्यात आली होती. त्यामध्ये दिलीप वळसे पाटील यांचं नाव आघाडीवर  होतं. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांच्या अखत्यारीत उद्या बहुमत चाचणी घेतली जाणार आहे. कोणत्याही गुप्त प्रकारे मतदान घेतलं जाऊ नये म्हणून दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे असं बोललं जातंय.     

WebTitle : NCP MLA Dilip Walse Patil appointed as Protem Speaker of the state assembly

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Dilip Walse Patil appointed as Protem Speaker of the state assembly