मुंबई लोकलनं प्रवास करत रोहित पवारांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा 

पूजा विचारे
Tuesday, 8 December 2020

रोहित पवारांनी मुंबई लोकलनं प्रवास केला आहे. त्याचेच हे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत. या फोटोत रोहित पवारांनी मुंबई लोकलनं प्रवास केला आहे. त्याचेच हे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमुळे सोशल मीडियावर बरीच चांगली चर्चा सुरु आहे.  काही कामानिमित्त हा प्रवास करुन रोहित पवारांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

त्यांनी फोटो शेअर करताना लिहिलं की, मुंबईत कॉलेजला असताना अनेकदा लोकलनं प्रवास करायचो. काल बऱ्याच दिवसांनी एका कामानिमीत्त अंधेरी ते मीरा रोड दरम्यान लोकलनं प्रवास करण्याचा योग आला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कोरोनाच्या संकटावर मात करून आपल्या मुंबईची ही लाईफ लाईन लवकरच पूर्ववत होईल अशी आशा करतो.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आहेत. रोहित पवार यांना साध्या राहणीमानासाठी ओळखलं जातं.  आमदार म्हणून निवड झाल्यानंतर रोहित पवार हे तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. रोहित पवार यांनी केलेल्या लोकल प्रवासामुळे त्यांचं कौतुक होताना दिसत आहे.

महत्त्वाची बातमी-  लालबाग सिलेंडर स्फोट: गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू, 5 जणांची प्रकृती चिंताजनक

ncp mla rohit pawar Visited local train ride from Andheri Meera Road


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp mla rohit pawar Visited local train ride from Andheri Meera Road