esakal | जेव्हा सुप्रिया सुळे रश्मी ठाकरे यांना म्हणतात, 'थँक्यू'
sakal

बोलून बातमी शोधा

जेव्हा सुप्रिया सुळे रश्मी ठाकरे यांना म्हणतात, 'थँक्यू'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत सर्व महाविकास आघाडी नेत्यांच्या पत्नी एकत्र दिसत आहेत. 

जेव्हा सुप्रिया सुळे रश्मी ठाकरे यांना म्हणतात, 'थँक्यू'

sakal_logo
By
पूजा विचारे

 मुंबईः गुरुवारी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे फोटो राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये एक खास फोटोही सुप्रिया सुळेंनी शेअर केला आहे. या फोटोत सर्व महाविकास आघाडी नेत्यांच्या पत्नी एकत्र दिसत आहेत. 

हा फोटो शेअर करताना सुप्रिया सुळे यांनी या सुंदर संध्याकाळबद्दल रश्मी ताईंचे आभार!, (Thank you Rashmi Tai for the lovely evening! ) असं कॅप्शन दिलं आहे. 

या फोटोत सुप्रिया सुळे यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारमधील जे मंत्री आहेत, त्यांच्या पत्नी दिसत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही निवडक फोटो समोर येताना दिसत आहेत. ज्यात महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांच्या मागे खंबीरपणे उभे असलेल्या त्यांच्या सौभाग्यवती पाहायला मिळत आहेत.

तसंच या फोटोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे तसंच जयंत पाटील यांच्या पत्नीही आणि अशा महिला मंडळ दिसत आहे.

अधिक वाचा- "मित्र त्यांना जाऊन मिळाला म्हणून हे चित्र", चंद्रकांत पाटील

सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करणार का?, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर शरद पवार यांनी स्पष्टिकरण दिलं आहे. आशिष शेलारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरु झाली होती. सुप्रिया सुळे यांना राज्यातल्या राजकारणात रस नसून त्यांना केंद्रातील राजकारणात रस असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा फेटाळून लावली. 

काय म्हणाले शरद पवार 

सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणात रस नसून त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रिया सुळे यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. त्यांना देशपातळीवरच काम करण्याची आवड आहे. प्रत्येकाची एक आवड असते. त्यांची आवड देशपातळीवरील कामात असल्याचं पवार म्हणालेत. दैनिक लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी या चर्चेवर भाष्य केलं. 

Ncp mp Supriya sule thank you rashmi thackeray share photo Sunitra pawar facebook

loading image
go to top