"चक्रीवादळाची पूर्वकल्पना असूनही ONGC असं केलंच कसं?"

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल
Nawab-Malik-ONGC-Barge
Nawab-Malik-ONGC-Barge
Summary

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: तौक्ते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) तडाख्यात सापडून अरबी समुद्रात (Arabian Sea) एक बार्ज बुडाली. या बुडालेल्या जहाजावरील ४९ कर्मचारी बेपत्ता आहेत. सलग चौथ्या दिवशी नौदलाकडून या कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरु आहे. ONGC चे P305 हे बार्ज सोमवारी अरबी समुद्रात बुडाले. आतापर्यंत २६हून जास्त मृतदेह (Dead Bodies) सापडले आहेत तर ४० हून अधिक कर्मचारी बेपत्ता (Missing) आहेत. त्यामुळे तौक्ते चक्रीवादळाचा इशारा दिलेला असतानाही हे बार्ज समुद्रात का गेले? त्याची चौकशी मुंबई पोलिस (Mumbai Police) करणार आहेत. याच मुद्द्यावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ONGC व्यवस्थापनाला काही सवाल केले आहेत. (NCP Nawab Malik angry ONGC Management over Barge P305 sinking incidence)

"तौक्ते चक्रीवादळाची साऱ्यांनाच पूर्वकल्पना होती. राज्य सरकार आणि IMD च्या माध्यमातून याबद्दलचे इशारे देण्यात आले होते. ONGC ने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि ७०० कामगारांचा जीव धोक्यात टाकला. वादळामुळे एक बार्ज बुडाल्यानंतर ३७ लोकांचा मृत्यू झाला. ४० हून जास्त जण बेपत्ता आहेत. शेकडो लोक मृत्यूशी झुंज देत असताना कोस्टगार्ड्स आणि नौदलाच्या जवानांनी त्यांना वाचवलं. या साऱ्याची जबाबदारी ONGC चीच आहे", असा आरोप त्यांनी केला.

"या संबंधीचा विषय चर्चेत आल्यानंतर आता पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यावर चौकशी समिती नेमत आहेत. पण केवळ चौकशी समिती नेमून चालणार नाही. जे कोणी जबाबदार व्यक्ती आहे, त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे. ONGC आणि बार्जमालक या घटनेची जबाबादारी एकमेकांवर ढकलत आहेत. असं होता कामा नये. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यायला हवा आणि त्यासाठी जे दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायलाच हवी", अशी मागणी मलिक यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com