आत्या- भाच्यावर मोठी जबाबदारी, मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी करणार एकत्र काम

आत्या- भाच्यावर मोठी जबाबदारी, मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी करणार एकत्र काम

मुंबईः आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या निवडणुकीला अजूनही दोन वर्ष शिल्लक आहे. मात्र सर्वच पक्षांनी त्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसनं जरी स्वबळाचा सूर आळवला आहे. मात्र करी राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करुन निवडणूक लढवावी असं मत मांडलं आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीसाठी मुंबईत संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खंबीर सदस्य यात लक्ष घालणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार या पालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. 

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहेत. त्यात भाजपने मिशन मुंबई अशी रणनिती आखली आहे. तर बीएमसीमधील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवावी असं म्हटलंय. परंतू राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक आघाडीतच लढवावी अशी भूमिका नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे भाजपनंही मिशन मुंबई अशी रणनिती आखली आहे. २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा फडकणार असं रोखठोक वक्तव्य  महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवीन टीमच्या माध्यमातून मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार याचा व्यक्त विश्वास फडणवीसांना व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपचं मिशन मुंबई सुरु झालं. देशात कोरोनाच्या सर्वाधित केसेस महाराष्ट्र आणि मुंबईत का ? देशातील सर्वाधिक मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये ४० टक्के लोकं महाराष्ट्रात का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाने मृत्यू झालेत. दुर्दैव म्हणजे कोरोनाच्या काळात प्रेताच्या टाळूवरच लोणी या सरकारने खाल्लं, असंही ते म्हणालेत.

ncp supriya sule rohit pawar responsibility mumbai municipal corporation elections 2022

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com