शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज;  खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन 

शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज;  खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन 
Updated on


अलिबाग : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. शेती करणे आता नकोसे झाले आहे. शेतकऱ्यांच्या हिताची चळवळ उभी राहिली पाहिजे. या चळवळीला दिशा देण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. शेतीविषयी शेतकऱ्यांच्या मनात असलेले नैराश्‍य झटकण्याची गरज आहे. त्यामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले. 

सहावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन अलिबाग तालुक्‍यातील कुरुळ येथील क्षात्रैक्‍य सभागृहात आयोजित करण्यात आले. या संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी शनिवारी (ता. 8) तटकरे बोलत होते. या वेळी खासदार संजय राऊत, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव आणि शेतकरी उपस्थित होते. या संमेलनासाठी राज्यभरातून शेतकरी उपस्थित असून 9 फेब्रुवारीपर्यंत हे संमेलन असणार आहे. 

या वेळी खासदार तटकरे म्हणाले, शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. शेतकरी उभा राहिला पाहिजे, या भूमिकेतून काम करून स्वतःला झोकून दिले. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी शरद जोशी लढले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नवे सरकार महाराष्ट्रात आले आहे. या सरकारच्या माध्यमातून सातबारा कोरा करण्याचा प्रयत्न केला जाईल. नुसता सातबारा कोरा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत; तर त्यांचे उत्पादन व शेतीवर होणारा खर्च याची सांगड घालून काम करणे आवश्‍यक आहे, असे तटकरे म्हणाले. 

शरद जोशींनी म. फुलेंचा वारसा जपला 
खासदार संजय राऊत म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्याचे काम शरद जोशी यांनी प्रामाणिकपणे केले आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते. त्यांनी या प्रश्नांचे राजकारण केले नाही, तर मला माझा शेतकरी उभा करायचा आहे, या तळमळीने त्यांनी काम केले. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड या विषयावर लिखाण केले. तो आसूड जोशी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत ठेवला. महाराष्ट्रासह मुंबई टिकविण्याचे काम शेतकऱ्यांनी केले. शेतकऱ्याच्या बांधावर सरकारने जायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार काम करण्याच्या प्रयत्नात आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com