रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकस आहारावर भर देण्याची गरज

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकस आहारावर भर देण्याची गरज

मुंबई: कोरोनामुळे आजही अनेकजण संक्रमित होत आहेत. मात्र त्याविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती महत्त्वपूर्ण असते. त्यातूनच लपलेल्या भुकेची समस्या सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे. जीवनसत्त्व आणि खनिजांची कमतरता हे यामागील महत्त्वाचे कारण असल्याने नागरिकांकडून सकस आहारावर भर देण्यात येत आहे. सकस आहारातून शरीरात न्यूट्रास्यूटिकल्सची गरज पूर्ण होण्यास मदत होत आहे. 

सर्वसामान्यांची पोषण आहारावर भर

‘आपले अन्न, आपले औषध आणि औषध आपले, अन्न असू द्या’, या धर्तीवर आजार टाळण्यासाठी सर्वसामान्यांकडून पोषण आहारावर भर दिला जात आहे. पारंपरिक भारतीय जेवणात कोशिंबीर, रायता, चटणी, लोणचे, पापड, डाळ, तांदूळ, तूप अशा विविध पाककृतींचा समावेश होता. ज्यामुळे ल्युटीन, ओमेगा-३ फॅटी ऍसिडदृष्टीने सूक्ष्म पोषक तत्व आणि पोषक घटकांच्या गरजा भागवल्या जात असे. मात्र, खतांच्या वापरामुळे भाज्या आणि फळांचे पौष्टिक मूल्य कमी झाले. त्यामुळे पोट भरत असले तरी लपलेली भूक भागवली जात नसल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. कोरोना संसर्गामुळे शरीरातील आवश्यक तत्त्वे कमी होतात. पण, कोरोना विषाणूंचा पूरक आहारांवर थेट परिणाम होत नसल्याने आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. 

रोग प्रतिकारशक्ती घटकांच्या विक्रीत घट

बाजारामध्ये रोग प्रतिकारशक्ती आणि प्रतिबंधक पूरक घटकांच्या विक्रीत वाढ झाली आहे. यामध्ये व्हिटॅमिन-ड, व्हिटॅमिन-क, झिंक, कर्क्युमिन, सेलेनियम आणि प्रोबायोटिक्स यांच्या उत्पादन वाढीचा उद्रेक झाला. त्याचवेळी अस्थॅक्सॅन्थिन, डाळिंब, ग्लूटाथिओनपासून पॉलिफेनॉल, आलं आणि लसूण सारख्या मसाल्यांच्या पदार्थांपासून रोग प्रतिकारशक्ती वाढते असेही समोर आले. औषधी वनस्पतींमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असलेले न्यूट्रासॉटिकल घटक आहेत. शुद्ध नारळाच्या तेलातील ल्यूरिक ऍसिड आणि मोनोलुरिनसारखे घटक व्हायरल इन्फेक्शनविरूद्ध प्रभावी ठरतात. 

अँटी-व्हायरल म्हणून लुटेओलिन, अपीगेनिन, क्वेरेसेटिन आणि कोलोजेनिक अ‍ॅसिडसारख्या घटकांचा अभ्यास केला गेला आहे. अंड्यातील पिवळ बलक, सोयातेल, शेंगदाणा तेल आणि मका यामध्येही दाहक-विरोधी गुण आहेत. न्यूट्रास्यूटिकल ही रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरली जाऊ शकतात. हे क्लिनिकल चाचण्या आणि अभ्यासाद्वारे सिद्ध करणे गरजेचे असल्याचे इंटरलिंक मार्केटिंग कन्सल्टन्सी प्रा. लिमिटेडचे संचालक डॉ. आर. बी. स्मार्था यांनी स्पष्ट केले आहे.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Need focus on a healthy diet boost the immune system

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com