नीरव मोदींच्या मालमत्तेचा ताबा घेण्याची परवानगी मिळाली; PNB बॅंकेला दिलासा

Neerav Modi
Neerav Modi sakal media

मुंबई : फरार आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदीच्या (neerav modi) सुमारे चारशे कोटी रुपयांच्या मालमत्तेचा (400 crore rupees property) ताबा घेण्याची परवानगी विशेष पीएमएलए न्यायालयाने (court) नुकतीच पीएनबी बॅंकेला (pnb bank) दिली आहे. यामुळे बॅंकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

मोदीच्या फायरस्टार डायमंड इंटरनैशनल प्रा लि आणि फायरस्टार इंटरनैशनल लिमिटेड (एफआयएल) या मालमत्तेचा ताबा पंजाब नैशनल बैकेला मिळाला आहे. यापैकी एफआयएलच्या 108.3 कोटी रुपयांची मालमत्ता तर अन्य कंपनीची सुमारे 331.6 कोटी रुपयांची मालमत्तेचा समावेश आहे. पीएमएलए न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत गुरुवारी उपलब्ध झाली आहे. ऋण वसुली आयोगाने बैकेच्या अंदाजित नुकसानीबाबत निर्देश दिले आहेत. एफआयएलला बैकेला सुमारे 1264 कोटी रुपये आहे आणि यावर सन 2018 पासूनचे व्याजही आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Neerav Modi
दिव्यांगांना राहत्या ठिकाणाजवळील पदोन्नतीने पदस्थापना मिळण्यास अडचण

ईडिने मोदीच्या अनेक मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यानंतर ही कारवाई करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र यापैकी अनेक मालमत्ता या अन्य कोणीतरी दावा करुन घेतलेल्या आहेत. यातीलच बैकेने आणि त्यांच्या कन्सोर्टियनने देखील काही मालमत्ता गहाण म्हणून घेतल्या होत्या. सामंजस्य करार करून बैकेने या मालमत्ता ताब्यात घेतल्या होत्या. मात्र ईडिने या मालमत्ता जप्त केल्यावर त्या परत मिळाव्यात म्हणून बैकेने न्यायालयात अर्ज केला होता. ईडीने मालमत्ता परत देण्यासाठी न्यायालयात तयारी दर्शविली. तसेच जर न्यायालयाने आदेश दिले तर त्या पुन्हा देण्याची हमी ईडिने मागितली होती. न्यायालयाने याची नोंद घेतली आणि संबंधित मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी परवानगी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com