वांद्रे टर्मिनसवर होणार 350 मीटर लांबीचा नवीन स्काय वॉक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bandra Terminus

पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवरून उपनगरीय लोकल सेवांचा प्लँटफॉर्म जाण्यासाठी प्रवाशांना अडचणीत येत आहे.

Bandra Sky Walk : वांद्रे टर्मिनसवर होणार 350 मीटर लांबीचा नवीन स्काय वॉक!

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवरून उपनगरीय लोकल सेवांचा प्लँटफॉर्म जाण्यासाठी प्रवाशांना अडचणीत येत आहे. त्यामुळे प्रवाशांचा सुविधेसाठी पश्चिम रेल्वेने आता वांद्रे उपनगरीय स्थानकाच्या उत्तर टोकाला असलेल्या ओव्हर ब्रिज वांद्रे टर्मिनसवर जोडण्यासाठी एक 350 मीटर लांबीचा नवीन स्काय वॉक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात प्रस्ताव सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. लवकरच रेल्वे बोर्डाला प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

सध्या पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवरून गाड्यांमध्ये येणा-या प्रवाशांना वांद्रे उपनगरीय स्थानकाच्या जाण्यास अडचणी येतात. खार रोड स्थानकांवरून स्कायवॉक उपलब्ध आहे. खार रोडवर फक्त धीम्या कॉरिडॉर उपनगरीय सेवा उपलब्ध आहे. परंतु जलद लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना वांद्रे स्थानकात यावेत लागात. खार स्थानकापासून रस्ते मार्ग लक्षणीय लांब असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

या समस्येवर मात करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने वांद्रे उपनगरीय स्थानकाच्या उत्तर टोकाला असलेल्या ओव्हर ब्रिजला वांद्रे टर्मिनसवर जोडण्यासाठी एक नवीन स्काय वॉक तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. या नवीन स्काय वॉकची लांबी सुमारे 350 मीटर असणार आहे. या स्काय वॉकमुळे सध्याच्या खार रोड कनेक्टिव्हिटी व्यतिरिक्त, प्रवासी वांद्रे उपनगरीय स्थानकावरून वांद्रे टर्मिनसला पोहोचू शकतात.

32.3 कोटी रुपयांचा खर्च -

पश्चिम रेल्वेने नुकताच नव्या स्काय वॉकसाठी सर्वेक्षण पथकाने नुकतीच पाहिनी केली आहे. तसा प्रस्ताव सुद्धा पश्चिम रेल्वेकडे सुपूर्द केला आहे. चालू वर्षाच्या पश्चिम रेल्वेने मंजुरीसाठी हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. या कामासाठी अंदाजे 32.3 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे असल्याची माहिती पश्चिम रेल्वेला दिली आहे.