esakal | पदभार स्वीकारताच बदल्यांच्या मुद्यावर नवीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

dilip-walse .jpg

जाणून घ्या नवीन गृहमंत्र्यांचा दृष्टीकोन 

पदभार स्वीकारताच बदल्यांच्या मुद्यावर नवीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले...

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई :"सध्याचा अवघड आणि कठिण काळ आहे. कोरोनामुळे सर्व पोलीस दल रस्त्यावर आहे. पोलिसांचं काम कायदा-सुव्यवस्था राखणं आहेच. पण त्याचबरोबरराज्य सरकारने घातलेल्या बंधनाची यशस्वीपणे अमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे" असे राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले. त्यांनी आज दुपारी मंत्रालयात येऊन गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. 

"नागरिक आणि सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. पोलीस दलाबद्दल विश्वास वाटला पाहिजे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करण्याचा माझा प्रयत्न राहिल" असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले. काम करताना आजी-माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घेईन असेही दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.  

दिलीप वळसे-पाटील यांनी सुरुवातीला नाकारलं होतं गृहमंत्रीपद कारण....

"पोलीस दलाचं सक्षमीकरण करण ही महत्त्वाची बाब आहे. स्वच्छ प्रशासन देण्यासंदर्भात माझा प्रयत्न राहील. प्रशासकीय कामात मी राजकीय हस्तक्षेप करणार नाही" असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. बदल्यांसंदर्भात जी सिस्टिम ठरली आहे, ते निर्णय त्याप्रमाणे होतील असे त्यांनी सांगितले. प्रस्तावित शक्ती कायदा, पोलीस भरती आणि पोलिसांसाठी १ लाख घरांची उभारणी, या सगळया गोष्टी करायच्या आहेत असे त्यांनी सांगितले. 
 

loading image