लग्नाच्या वाढदिवसाआधीच प्रियांका-निकच्या आयुष्यात नवा पाहुणा

प्रेरणा जंगम
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

प्रियांका चोप्रा मागील काही दिवस भारतात होती आणि नेटफ्लिक्सच्या The White Tiger या सिनेमाचे चित्रीकरणही करत होती. चित्रीकरण करत असताना प्रियांका मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी राहिली होती. काही दिवसांत प्रियांकाला काही कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्येही पाहिलं गेलं होतं.

प्रियांका चोप्रा मागील काही दिवस पति निक जोनास पासून दूर होती. आणि आता काम संपवून दोघं पुन्हा एकदा एकत्र भेटले आहेत. 1 डिसेंबर रोजी दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. मात्र या वाढदिवसाआधीच त्यांच्या घरी आलाय एक नवा पाहुणा. हा पाहुणा म्हणजे प्रियांकाची निकला खास भेट आहे. नुकतच या नव्या सदस्याला घेऊन प्रियांका निकला भेटण्यासाठी गेली होती.

प्रियांका जेव्हा निक जोनासला भेटली तेव्हा निकसाठी एक सरप्राईज गिफ्ट द्यायचं तिने ठरवले. हे सरप्राईज गिफ्ट दुसरे काही नसून एक जर्मन शेफर्ट पपी होता. निक झोपेत असताना अचानक प्रियांका हे सरप्राईज घेऊन त्याच्या बेडजवळ गेली. निकने जेव्हा या पपीला पाहिले तेव्हा त्यालाही आश्चर्य झालं. निक आणि प्रियांका या दोघांनाही प्राण्यांची आवड आहे. प्रियांकाजवळ आधीच डायना नावाची गोड पपी आहे. आणि आता निकला सरप्राईज देण्यासाठी प्रियांकाने ही नवी युक्ती सुचवली. सोशल मिडीयावर तर निकचे या पपीसोबतचे फोटो चर्चेत आले आहेत.

Webtitle : new member in priyanka chopra and nick jonas family 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new member in priyanka chopra and nick jonas family