खारघरमध्ये ट्रकच्या धडकेत १९ वर्षीय तरुण ठार, जखमी दोघांची प्रकृती चिंताजनक

खारघरमध्ये ट्रकच्या धडकेत १९ वर्षीय तरुण ठार, जखमी दोघांची प्रकृती चिंताजनक

मुंबईः नवी मुंबईतल्या खारघरहून मुंबईला जाताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झालेत. 

ट्रक धडक दिल्यानंतर कारमधील गंभीर झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात एका १९ वर्षीय तरुणाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवार रात्री दिड वाजता खारघर मधील हिरानंदानी पुलावर घडली.

पिनाक भरसाडिया हा मुलगा मुंबईतील फोर्ट येथे राहतो.  राहुल रावरिया आणि चैत्यन्य संजय जवेरी वय (19) हे तिघेही  हुंडाई कारने हे खारघर मधील मित्रांना भेटून आपल्या मुंबई फोर्ट येथील घरी जात होते. त्यावेळी खारघर मधील हिरानंदानी पुलावर असताना मुंबईकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रक चालकाच्या वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर ट्रक दुभाजक ओलांडून समोरील हुंदाई कारला  जोरदार धडक दिली. ट्रकच्या धडकेत कार हिरानंदानी पुलाच्या कठड्यावर  जाऊन आदळली.

पुलावर जोरदार वाहनाचा आवाज आल्याने पुलाखाली वाहतूक चौकीत कर्तव्यावर असलेल्या परमेश्वर पडळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिस स्टेशनमधील सहाय्य्क पोलिस आयुक्त नितीन भोसले, सहाय्य्क पोलिस निरीक्षक अरुण पढार, पोलिस निरीक्षक बिडवे आदींनी घटनास्थळी धाव घेत गाडीत अडकून पडलेल्या तिघांना बाहेर काढलं. 

पोलिसांनी जखमींना चैत्यन्य जवेरी यास पनवेल येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी  पिनाक भरसाडिया यांच्यावर  कामोठे येथील एमजीएम रुग्णालय  तर राहुल रावरिया यांस  खारघर मधील मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातास कारणीभूत असलेले ट्रक चालक फरार झाला आहे. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण पढार करत आहेत.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

new mumbai news Truck hits car Kharghar 19 year old boy dies Two injured

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com