
राज्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सरकार विविध पावलं उचलतंय. अशात आणखी काही महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेत. कोणताही कोविड किंवा नॉन कोविड रुग्ण न तपासात परत पाठवू नये असे आदेश सरकारकडून देण्यात आलेत.
मुंबई - राज्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सरकार विविध पावलं उचलतंय. अशात आणखी काही महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेत. कोणताही कोविड किंवा नॉन कोविड रुग्ण न तपासात परत पाठवू नये असे आदेश सरकारकडून देण्यात आलेत. कोरोना सदृश रुग्णाच्या टेस्ट या केल्याच पाहिजेत असेही आदेश सरकारकडून देण्यात आलेत.
गेल्या काही दिवसामध्ये रुग्ण दवाखान्यात आल्यावर त्यांच्या तपासण्या एकतर करण्यात येत नाहीत किंवा तपासण्या करण्यात उशीर होत होता असं निदर्शनास आलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता मुख्य सचिवांकडून नवीन आदेश काढण्यात आलाय.
नवीन निर्णयानुसार कोविड किंवा नॉन कोविड रुग्णाची तपासणी झालीच पाहिजे. त्यानंतर त्यांच्या रिपोर्ट नुसार त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात यावेत असे निर्देश देण्यात आलेत. कोविड संशयितांच्या कोविड टेस्ट या व्हायलाच पाहिजेत आणि १२ तासांमध्ये त्यांचे रिपोर्ट तपासून त्यांच्यावर पुढील कारवाई देखील करणं गरजेचं असणार आहे.
याचसोबत गेल्या काही दिवसात अशा काही बाबी निदर्शनात आलेल्या जेंव्हा कोविड रुग्णांचा मुर्त्यू झाल्यानंतर त्यांचं पार्थिव तसंच पडून रहात होतं. नवीन नियमांप्रमाणे कोविड रुग्णाच्या मृत्यूनंतर ३० मिनिटात वॉर्डमधून मृतदेह बाहेर काढला जावा आणि पुढील १२ तासात त्यांच्यावर विधी पार पाडण्यात यावा असेही आदेश देण्यात आलेत.
सर्वात मोठी बातमी - राज्यात 21 मे नंतर कोरोनाचा नवीन रुग्ण नसणार, वाचा काय आहे अहवाल
दरम्यान मुंबईत ऍम्ब्युलन्स मिळण्यास होणार उशीर पाहता आता मुंबईतील डिझॅस्टर मॅनेजमेंट हे ऍम्ब्युलन्सचं नियोजन पाहणार आहे. टीव्ही रिपोर्ट्स नुसार हे सर्व नियम २ मे पासून लागू होणार आहेत.
new rules for hospitals are issued by state government read full report