अभिमानास्पद! नववर्षाच्या स्वागतासाठी 70 अपंगांकडून कळसूबाई शिखर सर

अभिमानास्पद! नववर्षाच्या स्वागतासाठी 70 अपंगांकडून कळसूबाई शिखर सर

नेरळ  : महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसूबाई शिखरावर पोहोचून राज्यातील 20 जिल्ह्यांतील 70 अपंगांनी नववर्षाचे स्वागत अभिनव पद्धतीने केले. यात कर्जत येथील एका दिव्यांगाचा समावेश आहे. 

अनेकांनी फक्त शिक्षणाच्या कालावधीत अभ्यासक्रमात वाचलेले कळसूबाई शिखर प्रत्यक्षात चढण्याची यशस्वी मोहीम कर्जत येथील शिक्षण विभागात लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या आणि जन्मजात एका पायाने दिव्यांग असलेले 53 वर्षीय गिर्यारोहक जनार्धन पानमंद ही सहभागी झाले होते.आपल्या इच्छाशक्ती च्या जोरावर आजवर त्यांनी महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ल्यांवर यशस्वीपणे चढाई केली आहे कळसुबाई शिखर सर करण्याची ही त्यांची सातवी वेळ आहे.मोहिमेत त्याचा सहभाग इतरांनाही प्रेरणादायी ठरत होता. बरोबर दिव्यांगांच्या इच्छाशक्तीला जोड मिळाली शिवुर्जा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची,त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली अशी प्रतिक्रिया या मोहीमेत सहभागी दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली.मागील आठ वर्षांपासून यशस्वीपणे महाराष्ट्रातील दिव्यांगांना दरवर्षी शिवुर्जा प्रतिष्ठानच्या वतीने ही संधी उपलब्ध करुन देण्यात येते.या मोहिमेत सहभागी झालेले सर्व दिव्यांग कळसूबाईच्या पायथ्याशी जहॉंगीरदारवाडी या गावात एकत्र आले होते. 

31डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता सर्वांनी कळसूबाई शिखर चढाईला सुरुवात केली.छत्रपती शिवाजी महाराज की जय..... हरहर महादेव....कळसूबाई माते की जय अशा घोषणा देत दिव्यांगांनी शिखराकडे कूच केली.या मोहिमेत सहभागी असलेले स्त्री व पुरुष दिव्यांग एकमेकांना आधार देत होते.सायंकाळी त्या सर्वांनी कळसूबाई शिखराचा माथा गाठला.शिखरावर असलेल्या कडाक्‍याच्या थंडीत आणि सोसाट्याच्या वाऱ्यात सर्वांनी तंबूमध्ये मुक्काम केला.नववर्षाच्या पहाटेला जानेवारी 2021 रोजी माथ्यावर असणाऱ्या कळसूबाई मंदिरात दर्शन घेतले आणि नववर्षाच्या पहिल्या सूर्योदयाला उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने सर्वांनी स्वागत केले.एक जानेवारी 2021च्या सकाळी दहा वाजता सर्वांनी गडावरून परतीचा प्रवास सुरु केला.अवघ्या तीन तासात पायथ्या जवळील गाव गाठले.या आगळ्यावेगळ्या मोहिमेत विविध प्रकारचे दिव्यांग यात सहभागी झाले होते.सर्व सहभागी दिव्यांगांना शिवुर्जा प्रतिष्ठानच्या वतीने कळसुबाई शिखर यशस्वीपणे सर केल्याबद्दल प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. 

new Year 2021 Kalsubai Shikhar concered from 70 disabled people for New Years welcome

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com