नववर्षाचे स्वागत जपून करा! वसईच्या समुद्र किनाऱ्यावर पोलिसांची करडी नजर

नववर्षाचे स्वागत जपून करा! वसईच्या समुद्र किनाऱ्यावर पोलिसांची करडी नजर


वसई  ः वसई-विरारमध्ये आणि येथील समुद्र किनारी नवर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी गर्दी होत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर नागरिकांनी कोरोना संसर्गाचे भान जपावे व घरातच साधेपणाने सेलिब्रेशन करावे, समुद्रकिनारी गर्दी करू नये असे आवाहन वसई-विरार महापालिका प्रशासनाने केले आहे. याचे पालन न करणाऱ्यांवर, तसेच मद्यपींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. 

वसई तालुक्‍यातील कळंब ,नवापूर अर्नाळा, राजोडी , रानगाव याठिकाणी वर्षाला निरोप देण्यासाठी 31 डिसेंबरला गर्दी होते. मुंबईसह अन्य भागातून पर्यटक आनंद साजरा करण्यासाठी येतात. यासाठी रिसॉर्ट मध्ये लगबग सुरु असते. निसर्गरम्य वातावरण, गार वारा आणि त्यात घोडे, उंटावरून समुद्रकिनारी फेरफटका मारण्याचा आनंद दरवर्षी घेतला जातो. परंतु यंदा संचारबंदी असल्याचे नागरिकांना येथे सेलिब्रेशन करता येणार नाही. 
संचारबंदीमुळे पार्ट्या, समुद्रकिनारी होणारी गर्दी तसेच रात्री फिरणाऱ्या नागरिकांचा धिंगाणा यावेळी दिसणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्‍यतो घराबाहेर जाणे टाळावे. अशा सूचना देखील प्रशासनाने केल्या असून वसईतील राजोडी, कळंब, वसई इत्यादी किनाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसाची करडी नजर असणार आहे. 

- पोलिस बंदोबस्तात वाढ 
थर्टी फर्स्ट आणि नववर्षाला संचारबंदी, कोरोनाचे नियमाचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिस सज्ज झाले असून सार्वजानिक ठिकाणी समुद्रकिनारी, किल्ले परिसरात तळीरामांना रोखण्यासाठी नाकाबंदी करण्यात येणार आहे. यावेळी कायद्याचे उल्लंघन करताना आढळण्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. शहरातील मुख्य बाजारपेठा , चौक ,रस्ते याठिकाणी नाकाबंदी तसेच गस्त घालण्यात येणार आहे. मद्य पिऊन वाहन चालविणारे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. हॉटेल , रिसॉर्ट याठिकाणी रेव पार्ट्या , अंमली पदार्थाचे सेवन होणार नाही यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नाकाबंदी , गस्त व वाहनतपासणी करताना पोलीस अधिकारी , अमंलदार , राज्य राखीव पोलीस दल व होरमगार्ड बंदोबस्ताकरिता नेमण्यात आले आहे. मीरा भाईंदर , वसई विरार पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी तीन झोनचे पोलीस उपायुक्त प्रभारी म्हणून नियंत्रण ठेवणार आहे, अशी माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली 

यंदा कोरोनाचे सावट असल्याने हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे. थर्टी फस्ट व नववर्षानिमित्त खवय्यांची गर्दी होत असते परंतु यावर्षी मर्यादित ग्राहक असल्याने परिणाम झाला आहे. तसेच संचारबंदीमुळे आर्थिक झळ पोहचणार आहे. 
विरेंद्र पाटील
- हॉटेल व्यावसायिक, वसई 

कोरोना प्रादुर्भाव वाढू नये याकरिता सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. संचारबंदी असल्याने घराबाहेर निघू नये तसेच कुठेही गर्दी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल. 
गंगाथरन डी.
आयुक्त , महापालिका. 

New Year2021 Police keep a close eye on Vasai beach

--------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com