esakal | बॉयफ्रेंडला मैत्रिणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, बाचाबाचीनंतर 19 वर्षीय तरुणीची तिच्याच बॉयफ्रेंडकडून हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

बॉयफ्रेंडला मैत्रिणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, बाचाबाचीनंतर 19 वर्षीय तरुणीची तिच्याच बॉयफ्रेंडकडून हत्या

नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान म्हणजेच गुरुवारी रात्री एका 19 वर्षीय तरुणीची तिच्याच मित्राच्या घराच्या रूफ टॉपवर खार भागात हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर येतेय.

बॉयफ्रेंडला मैत्रिणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, बाचाबाचीनंतर 19 वर्षीय तरुणीची तिच्याच बॉयफ्रेंडकडून हत्या

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान म्हणजेच गुरुवारी रात्री एका 19 वर्षीय तरुणीची तिच्याच मित्राच्या घराच्या रूफ टॉपवर खार भागात हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर येतेय. यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत या तरुणीचा बॉयफ्रेंड आणि तिच्याच एका मैत्रिणीला ताब्यात घेतलं आहे. या दोघांवर सदर तरुणीची हत्या करण्याचा आरोप आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, "सदर हत्या झालेल्या महिलेचे नाव जान्हवी कुकरेजा आहे. जान्हवी आणि नऊ इतरांनी या पार्टीत हजेरी लावली होती." 

पोलिसांच्या माहितीनुसार जान्हवीने आपल्या बॉयफ्रेंडला तिच्याच एका मैत्रिणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. यानंतर या जान्हवीने आपल्या बॉयफ्रेंडला घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि जन्व्हावीचा बॉयफ्रेंड आणि तिच्याच मैत्रिणींनी तिच्यावर हल्ला केला.

महत्त्वाची बातमी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवुडमधील ड्रग्ज वितरणाप्रकरणी NCB ची जोरदार कारवाई
   
जान्हवी कुकरेजा ही बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात जात असताना तिच्या बॉयफ्रेंड आणि तिच्या मैत्रिणीने तिला पायऱ्यांवरून उतरताना धक्का दिला, असंही पोलिसांनी सांगितलं. खार पोलिसांनी अधिक माहिती देताना म्हंटलं की, या प्रकारामुळे कदाचित तिच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला असू शकतो. ते पुढे म्हणाले की, एका पोलिस पथकाने त्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहे, ज्यामध्ये पीडितेचा प्रियकर काही जखमांसह इमारत सोडताना पाहायला मिळाला. पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या इतर सात जणांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना आढळले की, 24 वर्षीय तरुण जो की तरुणीचा बॉयफ्रेंड होता तो तिची फसवणूक करत होता. 

पोलिसांनी सांगितले की, "तपास करत असताना आम्हाला असेही आढळले की, लढाईदरम्यान मुलीचे मोठ्या प्रमाणात केस ओढले गेलेत. सोबतच तिच्या शरीरावर पाठीवर आणि खांद्यावर काही जखमा आढळल्या आहेत. वादावादीचे रूपांतर भांडणात होऊन या तिघांमध्ये हातापायी झाली असल्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली. 

मुंबई भागातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Mumbai News in Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali

याप्रकरणी खार पोलिसांनी मुलीचा बॉयफ्रेंड आणि तिच्या मैत्रिणीवर खुनाचा गुन्हा दाखल केलाय. प्रथम दर्शनी ही हत्याच असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. मुलीची मैत्रीण आणि बॉयफ्रेंड तसेच इतर सात जणांची चौकशी केल्यावर पोलिस या निष्कर्षावर आले आहेत, असं डीसीपी एस चैतन्य यांनी म्हटलंय.

New Years Eve party in khar Mumbai 19 year girl found dead at two detained

loading image