esakal | नुकत्याच जन्मलेल्या बाळाला हातच नाही! हलाखीच्या परिस्थितीत कुटूंबीय करताहेत संगोपन
sakal

बोलून बातमी शोधा

नुकत्याच जन्मलेल्या बाळाला हातच नाही! हलाखीच्या परिस्थितीत कुटूंबीय करताहेत संगोपन

कमलाकर दळवी व  अनिता  दळवी या दांपत्यला पुत्र रत्न प्राप्त झाले. परंतु या मुलाला जन्मताच  दोन्ही  हात  नाहीत.

नुकत्याच जन्मलेल्या बाळाला हातच नाही! हलाखीच्या परिस्थितीत कुटूंबीय करताहेत संगोपन

sakal_logo
By
नामदेव खिरारी

जव्हार - पालघरमध्ये जव्हार तालुक्यातील खरोंडा गावात एक अनोखे बाळ जन्मला आले आहे. कमलाकर दळवी व  अनिता  दळवी या दांपत्यला पुत्र रत्न प्राप्त झाले. परंतु या मुलाला जन्मताच  दोन्ही  हात  नाहीत. त्यामुळे या दांपत्य अडचणीत सापडले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना कुटूंबाला आर्थिक मदतीची तयारी दर्शवली आहे.

महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी संदर्भातली आकडेवारी समोर, NCRB ची माहिती

जव्हारपासून  30 किलोमीटर अंतरावर असलेल्या खरोंडा गावात दळवी  कुटुंब राहते. परिस्थिती तशी बेताचीच! अनिता दळवी हिने  मागील में महिन्यात एका बाळला जन्म दिला आहे . पहिलाच मुलगा असल्याने कुटूंबात आनंद होता. परंतु बाळाला जन्मताच हात नव्हते. अशा परिस्थितीत दळवी कुटुंबाने बाळाचे चांगले संगोपन केले. कुटूंबाने बाळाची वेळोवेळी दवाखान्यात जाऊन तपासणी केली.या बाळासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी कुटूंबाला आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image