esakal | नेट सेट नसलेल्या प्राध्यपकांसाठी मोठी बातमी; मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

नेट सेट नसलेल्या प्राध्यपकांसाठी मोठी बातमी; मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश

नेट-सेट नसलेल्या वरिष्ठ महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या नियुक्तीच्या तारखेपासून त्यांची सेवा ग्राह्य धरून त्यांना अनुषंगिक लाभ व निवृत्तीवेतन देण्याबाबत सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. 

नेट सेट नसलेल्या प्राध्यपकांसाठी मोठी बातमी; मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश

sakal_logo
By
कृष्ण जोशी


मुंबई :  नेट-सेट नसलेल्या वरिष्ठ महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या नियुक्तीच्या तारखेपासून त्यांची सेवा ग्राह्य धरून त्यांना अनुषंगिक लाभ व निवृत्तीवेतन देण्याबाबत सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. 

आजपासून 'या' स्थानकादरम्यान लोकलच्या अधिक फेऱ्या; जाणून घ्या सविस्तर माहिती

नेट-सेट नसलेल्या (नेटसेटबाधित) प्राध्यापकांच्या समस्या तसेच पेन्शनसंबंधित प्रलंबित मागण्यांसंदर्भात शिवसेना प्रवक्त्या व आमदार मनीषा कायंदे यांनी मंत्री सामंत तसेच विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. महाराष्ट्र युनियन ऑफ सेक्युलर टीचर्स (MUST) च्या मागणीवरून ही बैठक झाली. याबाबत सामंत यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती कायंदे यांनी सकाळ ला दिली.  

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरव विजय, अप्पर सचिव विजय साबळे,  डॉ धनराज माने, संचालक उच्च व तंत्रशिक्षण संचालक धनराज माने हजर होते. वरिष्ठ महाविद्यालयातील  नेटसेटबाधित सहायक व सहयोगी प्राध्यापकांच्या निवृत्तीवेतनाचा मुख्य प्रश्न यावेळी चर्चिण्यात आला. या प्राध्यापकांना नेट-सेट अनिवार्य आहे, असा नियम युजीसी ने १९९१ मध्ये आणला व राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी चार वर्षांनंतर केली. त्यापूर्वीच नियुक्त झालेल्या प्राध्यापकांचा हा प्रश्न आहे. या प्राध्यापकांच्या नियुक्तीच्या तारखेपासूनची सेवा ग्राह्य धरून त्यांना अनुषंगिक लाभ व सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांना निवृत्ती वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार शासकीय आदेश काढावा अशी विनंती कायंदे यांनी केली. 

राज्य सरकारला परिक्षांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही; उच्च न्यायालयात याचिका दाखल

उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून नेटसेटबाधित सर्व निवृत्त प्राध्यापकांना त्वरित पेन्शन लागू करण्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी सचिव सौरभ विजय आणि संचालक डॉ. धनराज माने यांना निर्देश दिले. या प्राध्यापकांच्या सुयोग्य नियुक्त्या, वेतनवाढ, पदोन्नती आदी प्रश्न प्रलंबित असल्याचेही दाखविण्यात आले. यासंदर्भात पुढील चर्चा करण्यासाठी लौकरच दुसरी बैठक घेण्याचे निर्देशही सामंत यांनी दिले. शिक्षकांच्या प्रश्र्नांबद्दल सरकार संवेदनशील व सकारात्मक असून वरील सर्व प्रश्नांवर सुयोग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासनही सामंत यांनी दिले.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top