esakal | लोकलच्या वेळापत्रकाबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती 
sakal

बोलून बातमी शोधा

लोकलच्या वेळापत्रकाबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती 

लोकलच्या वेळा पुन्हा बदलणार?

लोकलच्या वेळापत्रकाबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांची संख्य पाहता राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे आणि गर्दीची ठिकाणी बंद राहणार आहेत. परंतु, या सगळ्या परिस्थितीमध्ये उपनगरीय लोकल सेवांचं काय असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला होता. पुन्हा एकदा लोकलच्या वेळा बदलणार का ही चिंता प्रवाशांना सतावत होती. मात्र, उपनगरीय लोकलसाठी कोणतेही विशेष निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून लागू असलेले नियमच यापुढेही कायम राहणार आहे.  तरी यादरम्यान प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी मर्यादित वेळेत लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र, अनेक जण ठाराविक वेळेच बंधन न पाळता अन्य वेळातही लोकलने प्रवास करुन लागले. परिणामी, लोकलमधील गर्दी वाढत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि कोरोना नियमांचे पालन करून घेण्यासाठी प्रशासनाची तारेवर कसरत सुरु आहे. त्यातच मुंबई महानगरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने लोकलमधील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासावर गदा आणण्याची शक्यता होती. मात्र, राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये कोणत्याही प्रकारचे नवीन नियम जाहीर न केल्याने जुनेच नियम लागू राहणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल डॉ. संजय ओक यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबईत सध्या मध्य रेल्वेवर एक हजार ६८५ आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एक हजार ३०० लोकल फेऱ्या धावत आहेत. लॉकडाउनपूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज ८० लाख प्रवासी प्रवास करत होते. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर २२ लाख आणि पश्चिम रेल्वेवर १६ लाख प्रवासी प्रवास करत आहे.

सर्व वाहनांत उभ्याने प्रवासबंदी

रेल्वे, बेस्ट व एसटी बसमध्ये बहुतेकवेळी प्रवाशांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त असते. त्यामुळे कित्येक प्रवासी उभे राहून प्रवास करतात. त्यामुळे अशा प्रवासाला बंदी घातल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. तसेच राज्यभरातील सर्व वाहतूक सेवेला हा नियम लागू असल्याचेही शेख यांनी स्पष्ट केले.
 

संपादन - शर्वरी जोशी

loading image