Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह चार जणांवर NIAकडून आरोपपत्र दाखल

दाऊदकडून मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी खंडणीच्या पैशाचा वापर
Dawood Ibrahim Khed
Dawood Ibrahim Khed esakal
Updated on

Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या गँगकडून करण्यात आलेल्या कारवायांबाबत राष्ट्रीय तपास एजन्सीनं अर्थात एनआयएनं दाऊदसह चार जणांवर शनिवारी आरोपपत्र दाखल केलं. यांपैकी तीन आरोपी हे सध्या अटकेत आहेत तर दाऊद याच्यासह छोटा शकील हे दोघे अद्याप फरार आहेत.

मुंबईतील बॉम्बस्फोटात दाऊदच्या गँगचा हात असल्याचं उघड झालं आहे. त्याचबरोबर दाऊदनं पाकिस्तानातून भारतात खंडणी तसेच दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे. या सर्व कारवायांच्या पार्श्वभूमीवर एनआयएकडून तपास सुरु आहे.

एनआयकडून यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आरिफ अब्दुल्ल शेख, शब्बीर अबुबकर शेख आणि मोहम्मद सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट यांचा समावेश आहे. तर खुद्द दाऊद इब्राहिम कासकर आणि शकील शेख ऊर्फ छोटा शकील या दोघांना एनआयएनं फरार घोषीत केलं आहे. यासर्व पाच जणांवर एनआयएनं आज आरोपपत्र दाखल केलं.

दाऊदच्या गँगकडून मोठ्या व्यावसायिकांकडून खंडणी उकळून त्या पैशांचा उपयोग दहशतवादी कारवायांसाठी होत आहे. हवालातून मिळालेल्या पैशाचा वापर मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी वापरण्यात येत होता अशी माहिती एनआयएला मिळाली, त्यावरून एनआयएनं ही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com