मोठी बातमी - प्रदीप शर्मांच्या घरात NIA च्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin-Vaze-Pradeep-Sharma

प्रदीप शर्मांच्या घरात NIA च्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे

मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने आज सकाळी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (pradeep sharma) यांच्या अंधेरीतील निवासस्थानी छापेमारीची कारवाई केली. केंद्रीय तपास यंत्रणा आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा प्रदीप शर्मा यांच्या निवासस्थानी असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. मन्सुख हिरेन हत्या आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणात प्रदीप शर्मांची एनआयएने याआधी चौकशी केली होती. (Nia recovered important evidance from encounter specialist pradeep sharmas home)

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरातून NIA नं मनसुख हिरेन हत्या व अँटिलिया स्फोटक प्रकरणी महत्वाचे पुरावे ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या पुराव्यांमध्ये काही इलक्ट्रॉनिक वस्तू, सॉफ्टवेअर, कागद पत्रे आणि शर्मा सध्या वापरत असलेला मोबाइल याचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तब्बल आठ तासांहून अधिक वेळ हे सर्च आँपरेशन सुरू होते. स्वत: NIA चे अधिकारी विक्रम खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्च आँपरेशन सुरू होतं.

दोन दिवसांपूर्वीच एनआयएन या प्रकरणात दोघांना अटक केली होती. एका आरोपीला लातूरमधून अटक केली होती. त्यानंतर आता थेट प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारीची कारवाई केली आहे. सचिन वाझे प्रमाणे प्रदीप शर्मा शिवसेनेशी संबंधित आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर नालासोपाऱ्यातून निवडणूक लढवली होती.

टॅग्स :pradeep sharma