मुंबईत ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर निर्बंध; वाचा नवी नियमावली | BMC Mayor Kishori Pednekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kishori pednekar

ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC) नवी नियमावली लागू केली आहे.

मुंबईत ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर निर्बंध

मुंबई - कोरोना व्हायरसच्या (Covid 19) नव्या व्हेरिअंटचे रुग्ण मुंबईत (Mumbai) वाढत चालले आहेत. त्यातच ख्रिसमस (Christmas) आणि न्यू इयर पार्टीच्या (New Year 2022) पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC) नवी नियमावली लागू केली आहे. ख्रिसमस न्यू इयर पार्टीनिमित्त कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यावर आणि लोकांना एकत्र येण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत.

मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा नवी नियमावली जारी केली. यात म्हटलं की, नववर्षानिमित्त मुंबई महानगर पालिका क्षेत्रात कोणत्याही खुल्या किंवा बंदिस्त जागेत एकत्र येण्यास किंवा समारंभ आयोजित करण्यावर बंदी असेल. २५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून हा आदेश पुढचा आदेश येईपर्यंत लागू राहील.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी याबाबत सांगितलं की, गेली दोन ते तीन दिवस केंद्रातून आलेल्या सूचना ऐकत आहोत. यात मोदींजी चिंता व्यक्त करत आहेत. ओमिक्रोनचा प्रादुर्भाव वाढतोय, त्या अनुषंगाने प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. उद्धवजी जिवाची पर्वा न करता तासंतास तज्ञ डाँक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहे. याचा त्रास त्यांनाही झाला म्हणूनच तिसरी लाट आली नाही, नागिकांचे सहकार्य ही तितकेच महत्वाचे होते.

पंतप्रधानांनी अलर्टची घोषणा केली. पहिल्यांदा विमानप्रवास थांबवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. आज रात्री ९ ते ६ पाच माणसाच्या वर नागरिक जमता कामा नये. कार्यक्रम सभा यांच्यावरही निर्बंध लावण्यात आले असल्याची माहिती महापौर पेडणेकर यांनी केली.

नव्या आदेशानुसार हॉटेल, बार, रेस्टॉरंट, खासगी इमारती जिथे कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते अशा ठिकाणी गर्दीला बंदी असणार आहे. दरम्यान, राज्य सरकारनेसुद्धा रात्री ९ ते सकाळी सहा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनाचे १४१० नवे रुग्ण आढळले होते. यामध्ये २० ओमिक्रॉनचे रुग्ण होते. राज्यातील नवे नियम मुंबईसाठीही लागू असतील. नियम सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

हेही वाचा: राज्यात नवे निर्बंध लागू; अनिल परबांची घोषणा

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं थर्टी फर्स्टच्या पार्टीवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक तयार केलं आहे. प्रत्येक प्रभागात दोन पथकं नेमण्यात आली आहेत. त्यातही वेळप्रसंगी वाढ करण्यात येईल असंही आयुक्तांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावलीसुद्धा जारी करण्यात आली आहे. यामध्ये दुबईतून मुंबईत येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही, पण मुंबईत आल्यावर ७ दिवस घरीच क्वारंटाइन रहावं लागेल. शिवाय त्यांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: Night Curfew In Mumbai Christmas New Year Celebration Guidelines Bmc Mayor Pednekar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BMCkishori pednekar