नाईट कर्फ्यू दरम्यान गाडी फिरवणाऱ्या वाहन चालकांना मुंबई पोलिसांचा इशारा

नाईट कर्फ्यू दरम्यान गाडी फिरवणाऱ्या वाहन चालकांना मुंबई पोलिसांचा इशारा

मुंबईः राज्यात मंगळवारपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या नाईट कर्फ्यूमध्ये काटेकोर अंमलबजावणीसाठी मुंबई पोलिसही सज्ज आहेत. एखादी व्यक्ती रात्री विनाकारण वाहन फिरवताना आढळल्यास मुंबई पोलिसांकडून त्या व्यक्तीचं वाहन जप्त करण्यात येणार आहे. त्यात नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नाईट कर्फ्यूमधून सूट देण्यात आली आहे. मुंबई पोलिस दलाचे कायदा सुव्यवस्थेचे पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान हॉटेल, पब, बार, रेस्टॉरंट तसंच करमणूक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नाईट कर्फ्यूमधून सूट देण्यात आली  नसल्याचंही नांगरे पाटील यांनी सांगितलं आहे. रात्री ११ ते पहाटे ६ यादरम्यान रस्त्यावर कोणी गाडीवर फिरताना दिसल्यास त्या व्यक्तीचं वाहन जप्त केलं जाईल. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर मात्र ही कारवाई होणार नसल्याचंही असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबई पोलिस काय म्हणतायत? 

नाईट कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
पब, बार आणि थिएटर्स 11 वाजता बंद करावेच लागतील
नाईट कर्फ्यू लोकांच्या हितासाठी त्याचे पालन करा
5 पेक्षा अधिक लोकांनी नाईट कर्फ्यूदरम्यान फिरू नये
चारचाकी वाहनांमध्ये 4 पेक्षा जास्त लोकांनी फिरू नये

नाईट कर्फ्यूच्या आदेशाचं कठोर पालन केलं जाईल. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. नाकाबंदीमध्येही वाढ करण्यात जाईल. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळता रात्री ११ ते पहाटे ६ यादरम्यान रस्त्यावर कोणी गाडीवर फिरताना दिसल्यास त्याचं वाहन जप्त केलं जाईल. नागरिकांनी रात्री रस्त्यावर येऊ नये आणि घरातूनच नववर्षाचं स्वागत करावं, असं मुंबई पोलिस उपायुक्त एस. चैतन्य म्हणाले.

night curfew mumbai everything and go out past 11pm not on group

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com