esakal | ठाणे महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी, वाहनांची होणार कसून तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी, वाहनांची होणार कसून तपासणी

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी जाहीर केली. ठाण्यात पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या निर्देशाने कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी, वाहनांची होणार कसून तपासणी

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

मुंबईः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात आणि ठाणे शहरात गतीने पसरत आहे असे दिसून येत आहे. तसेच ब्रिटनची राजधानी लंडनसह पूर्ण इंग्लडमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकारचा व्हायरस संसर्ग वेगाने फैलावत आहे. कोरोना ब्रिटनमध्ये आढलेला कोरोना व्हायरसपेक्षा 70 टक्के अधिक घातक आणि वेगाने फैलावतो आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या निर्देशाने कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

प्रतिबंधक उपाययोजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 (1)(3) खालील तरतुदीच्या अनुषंगाने ठाणे पोलिस हद्दीत 22 डिसेंबर 2020 पासून पुढील आदेश येईपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात येत आहे. या कालावधीत धार्मिक उत्सव किंवा कार्यक्रम साजरा करावयाचा असल्यास कार्यक्रम आयोजकांनी संबंधित पोलिस ठाणेकडून त्याबाबत विशेष परवानगी आवश्यक राहील.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संचारबंदी कालावधीत खालील बाबी चालू राहणार नाहीत

सर्व प्रकारच्या आस्थापना तसेच सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणे, विरंगुळ्यासाठी फिरणे, सायकल, मोटासायकल, मोटार वाहनांतून विनाकारण फेरफटका मारणे, अनावश्यक आणि विनाकारण होणारी वाहतूक, मोटार इमारतीच्या, सोसायटीच्या आवारात किंवा येथे साजरे होणारे खाजगी समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, हॉटेल आस्थापणा, पब्ज, क्लब, रिसॉर्ट इत्यादी.
 
संचारबंदी कालावधीत खालील बाबी चालू राहतील

यापूर्वी सरकारनं ज्या आस्थापना सुरू ठेवण्याबाबत परवानगी दिलेली आहे त्या वैद्यकिय सेवा पुरविणाऱ्या आस्थापना, अत्यावश्यक सेवा बजावणारे, अत्यावश्यक किंवा तातडीची वैद्यकिय गरज तसेच अत्यावश्यक सेवा उदा. दुध, भाजीपाला यांची वाहतूक आणि पुरवठा इत्यादी चालू राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल.

हेही वाचा-  राज्यपाल नियुक्त आमदारांसंबंधित याचिका : देशाच्या एटर्नी जनरलना नोटीस बजावून भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Night curfew thane announced Municipality area cp vivek phansalkar

loading image