निलेश राणे यांना भाजपकडून मिळाली मोठी जबाबदारी, ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर केलं जाहीर

निलेश राणे यांना भाजपकडून मिळाली मोठी जबाबदारी, ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर केलं जाहीर

मुंबई : नुकत्याच महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळाली. कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर जरी ग्रामपंचायत निवडणुका लढवता येत नसल्या तरी प्रत्येक पॅनलचा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा हा असतोच. याच पार्श्वभिवर यंदा कोकणात भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणाऱ्या पॅनल्सचा मोठ्या प्रमाणात विजय झालेला पाहायला मिळतोय.

राज्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार अस्तित्त्वात असतानाही भाजपाला जेवढा प्रतिसाद मिळाला नव्हता तेवढा प्रतीसाद यंदा ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात मिळाला, असं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत. याबाबत बोलताना त्यांनी या विजयाचं श्रेय भाजपचे नेते निलेश राणे आणि सर्व राणे कुटुंबियांना दिलं आहे. 

दरम्यान, यंदाच्या निवडणुकांच्या निकालानंतर लगेचच आता निलेश राणे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून भारतीय जनता पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणात भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर  राणे कुटुंबावर भाजपनं आणखी एक जबाबदारी दिली आहे.

nilesh rane appointed as Bharatiya Janata Party Maharashtra State Secretary

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com