निलोफर मलिकने देवेंद्र फडणवीसांना पाठवली नोटीस | Nilofer Malik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निलोफर मलिकने देवेंद्र फडणवीसांना पाठवली नोटीस

निलोफर मलिकने देवेंद्र फडणवीसांना पाठवली नोटीस

sakal_logo
By
रश्मी पुराणिक

मुंबई: राज्यात सध्या नवाब मलिक (Nawab malik) विरुद्ध देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) असा सामना सुरु आहे. नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी परस्परांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप-प्रत्यारोप केले आहेत. दरम्यान नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिकने (Nilofer malik) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

निलोफर यांचे पती आणि नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी हा आरोप केला होता. हा आरोप चुकीचा असल्याचा दावा करत निलोफर यांनी फडणवीस यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे.

हेही वाचा: पाकिस्तानच्या माजी सैनिकाचा भारतात पद्म श्री पुरस्काराने सन्मान

निलोफर मलिक सुद्धा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करत आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी "डुकराशी कुस्ती खेळू नये, हे मी आधीच शिकलो आहे. तुमच्या अंगाला घाण लागते, पण डुकराला ते आवडतं" असं टि्वट फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर निलोफर मलिक यांनी "आयुष्यात एक बळीचा बकरा शोधू नका. आपण केलेल्या चुकांची फळ भोगायला तयार राहा" असं उत्तर दिलं होते. अमृता फडणवीस यांच्या बिगडे नवाब टि्वटचाही निलोफर मलिक यांनी समाचार घेतला होता.

loading image
go to top