मुंबईच्या हवेत नऊ सिगारेट इतका धूर!

File Photo
File Photo

मुंबई, ता. ५ : मुंबईत सिगरेट न ओढणाऱ्या व्यक्तीने श्‍वास घेतल्यास दिवसभरात शरीरात नऊ सिगारेटइतका धूर जमा होत आहे; तर नवी मुंबईत हे प्रमाण आठ सिगारेट एवढे आहे. तसेच वांद्रे-कुर्ला संकुल आणि मालाडमध्ये आज १२ सिगारेटच्या धुराएवढे प्रदूषण होते.

भारतीय उष्ण कटिबंधीय संस्थेने सफर उपक्रमांतर्गत आज मुंबईत तरंगत्या धूलिकणांचे प्रमाण (पीएम २.५) प्रतिघनमीटर १९६ मायक्रोग्रॅम होते; तर नवी मुंबईत १७१ मायक्रोग्रॅम होते. ‘बार्कले अर्थ’ या पर्यावरणावर संशोधन करणाऱ्या संस्थेने एका सिगारेटमध्ये २२ मायक्रोग्रॅम पीएम २.५ असल्याचा निष्कर्ष काढला आहे. याचा अर्थ एका व्यक्तीने मुंबईत श्‍वास घेतल्यास नऊ सिगारेट ओढल्याइतका धूर; तर नवी मुंबईत आठ सिगारेट ओढल्याइतका धूर असल्याचे म्हणता येईल.

थंडीच्या काळात हवेचा वेग मंदावत असल्याने प्रदूषके वाहून जाण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे या काळात प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले असते. सिगारेटच्या व्यसनामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाची शक्‍यता ४० ते ५० टक्‍क्‍यांनी वाढते, असे वेगवेगळ्या संशोधनांत आढळले आहे; तर मुंबईत थंडीचा मोसम वगळता इतर वेळी तीन ते चार सिगारेटच्या धुराएवढे प्रदूषण असते.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com