esakal | घरोघरी लसीकरण चांगलं, पण एका डोसमागे ९ डोस वाया जाणार का?
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

घरोघरी लसीकरण चांगलं, पण एका डोसमागे ९ डोस वाया जाणार का?

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : सहा महिन्यांहून अधिक काळापासून बेडवर उपचार घेत असलेल्यांचे लसीकरण(Corona Vaccination) करण्याचे पालिकेचे (BMC) नियोजन आहे. मात्र, एका वायलमध्ये 10 डोस असून एका घरातील एका बेडरिडन पेशंटमागे 9 डोस वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  त्यामुळे 1 ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण (Home Vaccination) करण्याचा निर्णय राज्य सरकारची नियमावली जाहीर झाल्यानंतर घेतला जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी(Suresh kakani) यांनी स्पष्ट केले. ( Nine Dose would wastage behind one patient MBC afraid of this- nss91)

दरम्यान, बेड रिडन रुग्ण हा सहा महिन्यांपासून अंथरुणाला खिळून असेल तर त्या व्यक्तीस घरी जाऊन लस देण्याची पालिकेची तयारी आहे. मात्र लस दिल्यानंतर त्या रुग्णाला अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवणे गरजेचे आहे. तसेच या पेशंटला फॅमिली डॉक्टरकडून लस घ्यावी का, असे होकारार्थी पत्र आणणे बंधनकारक करण्यात येणार आहे. परंतु, लसींच्या एक वायलमध्ये 10 डोस असतात. एका घरात एकच जेष्ठ नागरिक असेल तर मग 9 डोस वाया जाऊ शकतात. म्हणून मग घरातील इतर सदस्य लसीकरणाची मागणी करतील तर तसे सगळ्यांचे लसीकरण योग्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या नियमावली नंतर पालिका योग्य तो निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.

65 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण

मुंबईत 50 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे तर दुसरा डोस साधारण 15 लाख लोकांनी घेतला आहे. मुंबईला एकूण 1 कोटी 80 लाख डोसची आवश्यकता होती.आतापर्यंत 50 टक्के लस मिळाली असल्याचेही काकाणी यांनी सांगितले.

loading image