ठाणे जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पाचे ९६ कोटींचे उड्डाण | Thane ZP Budget | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thane zilla parishad budget

ठाणे जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पाचे ९६ कोटींचे उड्डाण

ठाणे : मागील दोन वर्षांपासून कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे (corona pandemic) त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पावर (Thane zilla parishad) झाला होता. मात्र, आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूका (election) डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या अर्थसंकल्पात (budget) नवीन पूर्ण योजनांचा समावेश करीत मांडण्यात आला. यावेळी ९६ कोटींचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थासामिती सभापती सुभाष पवार (sudhakar pawar) यांनी सादर केला.

हेही वाचा: मोखाड्यात भीषण पाणी टंचाईच्या झळा; चारा, पाण्याच्या शोधात जणावरांचे स्थलांतर

यामध्ये शाळांचे सौर उर्जीकारण करणे, शाळांचे वीज बिल भरणार, दिव्यांगासाठी मध्यवर्ती विक्री केंद्र उभारणार तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी वाव मिळावा यासाठी कृषी कर्ज मित्र योजनेसह पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेअंतर्गत शेतकरी, शेतमजुर, बचतगट, ग्रामसंघ यांना भाजीपाला विक्रिसाठी साहित्य पुरविणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत ग्रामिण भागात तातडीची सुविधा देणेसाठी बास्केट स्ट्रेचर खरेदी करणे या नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Ninety Six Crore Provision In Thane Zilla Parishad Budget 2022 Thane News Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ThaneBudget 2022