निरंजन डावखरे यांना शिक्षक संघटनांचा पाठिंबा

निरंजन डावखरे यांना शिक्षक संघटनांचा पाठिंबा

पालघर, ता. ८ (बातमीदार) : कोकण पदवीधर विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांना तिसऱ्या वेळी पुन्हा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना व पतपेढी, तसेच पालघर जिल्हा शिक्षण संस्था संघटनेतर्फे त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील शाळांना संगणक व डिजिटल साहित्य त्यांनी वाटप केले असून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे व विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचे वेतनाचे प्रश्नही डावखरे यांनी सोडवल्याने त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पाठिंबा देण्यात आला.

पालघर येथे एस. टी. कदम सीबीएससी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालघर जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचे पदाधिकारी व पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे व पतपेढीचे पदाधिकारी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांची नुकतीच संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिक्षण संस्थांचे व शिक्षकांचे शिक्षक, तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आमदार निरंजन डावखरे यांच्या निदर्शनात आणले. यावर डावखरे यांनी या प्रश्नाविषयी शिक्षणमंत्री यांची बैठक घेऊन प्रश्न सोडविले जातील, अशी ग्वाही उपस्थितांना दिली. या बैठकीला जिल्हा शिक्षण संस्था संघटनेचे अध्यक्ष वागेश कदम, चंदुलाल घरत, मार्तंड पाटील, नवनीत पाटील, चिंतामण ठाकूर, चंद्रशेखर पाटील, अशोक राऊत, भूषण सावे, जितेंद्र राऊत, विविध पाटील, संतोष लोखंडे, प्राचार्य नितीन वर्तक, जयंत दांडेकर, रवींद्र ठाकूर, गणेश प्रधान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com