Mumbai : निर्मला सीतारामन यांची जेएनपीटी बंदराला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai
निर्मला सीतारामन यांची जेएनपीटी बंदराला भेट

निर्मला सीतारामन यांची जेएनपीटी बंदराला भेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज जेएनपीटी बंदराला भेट दिली. यादरम्यान जेएनपीटी बंदरात तयार करण्यात येणाऱ्या मध्यवर्ती वाहनतळ प्लाझाच्या इमारतीच्या कामाचे सीतारामन यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. तसेच सीतारामन यांनी जेएनपीटी बंदर आणि आजूबाजूच्या परिसराची समुद्रातून पाहणी केली. निर्मला सीतारामन यांनी आज जेएनपीटी बंदराला भेट देऊन बंदरातील सीमा शुल्क सुविधांच्या श्रेणीतील सर्वसमावेशक माहिती आणि उद्योग आणि व्यापाराबाबत आढावा घेतला.

तसेच जेएनपीटी प्रशासनाने व्यापार आणि वाणिज्य अधिक गतिमान करण्याच्या दिशेने बंदराची वाटचाल योग्य रीतीने होत असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी जेएनपीटी बंदरात तयार केलेल्या अत्याधुनिक मध्यवर्ती वाहनतळ प्लाझाच्या इमारत प्रकल्पाची पाहणी केली. तसेच निर्यात कंटेनरसाठी सीमाशुल्क सुविधा उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहितीही जाणून घेतली. याशिवाय त्यांनी जेएनपीटीतील गजेबो व्ह्यू पॉईंटवरून आसपासचे विहंगम दृश्याचा लाभ घेतला. बुधवारी सीतारामन यांनी बोटीतून समुद्राची सैर करीत जेएनपीटी बंदराची पाहणी केली. याप्रसंगी जेएनपीटीतर्फे त्यांना जलमार्गे होणाऱ्या व्यापाराची माहिती देण्यात आली. बंदरावर आल्यावर सीतारामन यांना सीआयएसएफच्या जवानांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. या प्रसंगी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी आणि उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी जेएनपीटीतर्फे सीतारामन यांचे स्वागत केले.

loading image
go to top