Nitin Banugade Patil Dasara Melava: "प्या बियर करा चियर असं महाराष्ट्र सरकारचे धोरण"; नितीन बानगुडे पाटलांचा आरोप

Nitin Banugade Patil Dasara Melava
Nitin Banugade Patil Dasara Melava

Nitin Banugade Patil Dasara Melava:  शिवसेना ५७ वर्षांची झाली. शिवसेना एकचं...शिवसेना ठाकरे यांचीच आहे, असे शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील शिवतीर्थवर म्हणाले. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही पण आमच्याच वाटेवर येऊन कुणी आमची वाटमारी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, असा इशारा नितीन बानगुडे पाटील यांनी शिंदे गटाला दिला.

बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना आपल्या हाताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात सोपवली. शिवसेना वाढली बहरली. शिवसेनेचा वृक्ष झाला त्याला असंख्य फळं लागली, काही फळं गळून पडली. काही फळं पडून गेली. वृक्ष छाटण्याचा प्रयत्न करण्यात आला पण शिवसेना संपली नाही. गेली ती फळं उरली ती शिवसेनेला घट्ट करणारी मुळं, असे पाटील म्हणाले.

शाळा  बंद करत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या का घटली. यावर सरकारने अभ्यास गट नेमला नाही. मात्र बियरची विक्री घटली म्हणून सरकारने अभ्यास गट नेमला आहे, प्या बियर करा चियर असं महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे, असा आरोप बानगुडे पाटील यांनी केली.

Nitin Banugade Patil Dasara Melava
Uddhav Thackeray Dasara Melava: शिवाजी पार्कवर अवतरले 'बाळासाहेब ठाकरे' ; निष्ठावान शिवसैनिकांची मांदियाळी

महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे. ज्या राज्याने देशाला दिशा दिली त्या राज्याला कोणत्या दिशेला घेऊन जात आहेत? १५ लाखाचं काय झालं? शेतकऱ्यांना हमीभाव देणार होते काय झालं?, असा प्रश्न नितीन पाटील बानगुडे यांनी विचारला आहे. (Latest Marathi News)

महाशक्ती आहे तर मराठ्यांना आरक्षण का दिले नाही, धनगरांना आरक्षण का दिले नाही. निर्णय वेगवान शासन गतिमान तर निर्णय घ्या.  राज्यात आरक्षणासाठी लोक आत्महत्या करत आहेत.

Nitin Banugade Patil Dasara Melava
Dasara Melava: 'माझ्या उद्धवला सांभाळा' हे आवाहन बाळासाहेबांनी ज्या खुर्चीतून केलं, ती दिसणार शिंदेंच्या मेळाव्यात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com