esakal | पहिली ते आठवी सरसकट पासच्या निर्णयावरून गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

varsha gaikwad

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी त्यांना प्रमोट (वर्गोंन्नती) करण्याचा निर्णय जाहीर करून पाच दिवस उलटून गेले.

पहिली ते आठवी सरसकट पासच्या निर्णयावरून गोंधळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी त्यांना प्रमोट (वर्गोंन्नती)  करण्याचा निर्णय जाहीर करून पाच दिवस उलटून गेले. मात्र  अद्यापही शालेय शिक्षण विभागाने त्यासाठीचा जीआर अथवा साधे एक परिपत्रक जारी करण्यात न आल्याने राज्यभरात याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.  आपल्याकडे शिक्षण विभागाकडून कोणताही आदेश अथवा परिपत्रक मिळाले नसल्याचे सांगत राज्यातील अनेक शाळांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा सुरू ठेवल्या आहेत.यामध्ये  मुंबई, नवी मुंबई. आणि ठाणे जिल्ह्यातील सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी तर आपल्या परीक्षा उरकून पुढील  शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली आहे. तर काही शाळांमध्ये अद्यापही परीक्षा सुरू असल्याची माहिती पालकांकडून देण्यात आली.

शालेय शिक्षणमंत्र्यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच त्यासाठीचा आदेश हा दुसऱ्या दिवशी निघणे अपेक्षित होते, परंतु अजूनही शाळांना तशा सूचना अथवा लिखित आदेश पोचलेले नसल्याचे   मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले.

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा

पहिली ते आठवपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्गोंन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी  विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे  हे जाहीर करणार आहे, त्यासाठीच्या सूचना परिषदेला देण्यात आल्या आहेत.त्यामुळे लवकरच या सूचना जाहीर केल्या जातील.
- राजेंद्र पवार, उपसचिव, शालेय शिक्षण

loading image