मेट्रोच्या आमंत्रणपत्रिकेत महापौरांचे नावच नाही; शिवसेनेची नाराजी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

निमंत्रण पत्रिकेत फक्त उद्धव ठाकरे वगळता एकही शिवसेना आमदार खासदाराचे नाव नाही. शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली.

मुंबई : मेट्रो 10, 11, 12 आणि मेट्रो भवनचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमीपूजन होत आहे. परंतु, त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आमंत्रण पत्रिककेत मुंबईचे प्रथम नागरिक असलेले महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे  नाव नाही. त्यामुळे युतीत वरकरणी अलबेल असल्याचे दाखविण्यात येत असले तरी आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भूमीपूजनाचे श्रेय घेण्यासाठी भाजपने केल्याची कुजबूज ऐकू येत आहे. 

निमंत्रण पत्रिकेत फक्त उद्धव ठाकरे वगळता एकही शिवसेना आमदार खासदाराचे नाव नाही. शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सदर प्रकार नजर चुकीने झाला असून ही चूक मान्य करत असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले. 

सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची भूमिका स्पष्ट केली नाही. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर शेवाळे कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no name of mumbai mayor in metro inauguration invitation card