esakal | गुड न्यूज : दादरमध्ये एकही नवा कोरोना रुग्ण नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

corona

गुड न्यूज : दादरमध्ये एकही नवा कोरोना रुग्ण नाही!

sakal_logo
By
मिलींद तांबे

मुंबई : धारावी नंतर मुंबईतील माध्यवर्ती बाजाराचे व गर्दीचे ठिकाण असलेल्या दादर (Dadar)परिसरामध्ये आज एक ही नवीन कोरोनाबाधित (no new Corona patient) रुग्ण आढळला नाही. दादर मध्ये आज 0 रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णांचा आकडा 9701 आहे. तर दादर मध्ये केवळ 116 सक्रिय रुग्ण (Active corona patients) आहेत. धारावीमध्ये आज 2 रुग्ण आढळले. धारावीतील (Dharavi) एकूण रुग्णसंख्या  6905 झाली आहे. माहीम मध्ये आज 5 नवे रुग्ण सापडले असून माहीम (mahim) मधील एकूण रुग्ण 10,034 झाले आहेत. जी उत्तर मध्ये आज 7 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांचा आकडा 26,640 झाला आहे. ( No new Corona patient found in dadar)

मुंबईत आज 453 नवीन रुग्ण सापडले. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,25,620 इतकी झाली आहे. आज 482 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,99,823 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत 73,53,737 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.  कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर 0.8 % इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 822 दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 % आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 7,908 हजारांवर आला आहे.

हेही वाचा: चांगली बातमी : मुंबईत कोरोना लसीकरण हळूहळू पूर्वपदावर

मुंबईत आज दिवसभरात 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 564 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 4 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 6 पुरुष तर 4 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 4 रुग्णाचे वय 40 च्या खाली होते.तर 6 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

loading image