worli koliwada
worli koliwada

वरळी-कोळीवाड्यातून मागच्या १० दिवसात एकही कोरोना रुग्ण नाही

वरळी-कोळीवाड्यातील नागरिकांनी करुन दाखवलं

मुंबई: कामासाठी सतत धावपळ करणाऱ्या मुंबईतील नागरिकांना कोरोना विषाणूमुळे (corona virus) लॅाकडाउनमध्ये (lockdown) काही काळ घरी बसायला भाग पाडले. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असणाऱ्या धारावीत कोरोनाने हातपाय पसरले. याच धारावीत (dharavi) कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आणि धारावी कोरोनाच्या विळख्यात सापडली. मात्र, मुंबई महानगर पालिका प्रशासनाने (bmc) जीवाची बाजी लावत 'कोरोनामुक्त धारावी' अशी मोहिम राबवली. आता धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आलीय. (No new Covid case in Worli Koliwada for 10 days says BMC)

त्यापाठोपाठ मुंबईतील वरळी कोळीवाड्यातील परिस्थिती काहिशी बदलली आहे. देशात कोरोनाची लाट ओसरत असताना, दुसरीकडे वरळी कोळीवाडाही कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे. वरळी-कोळीवाडा आणि जीजामाता नगरमध्ये मागील दहा दिवसांपासून एकाही नव्या कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही.

'वरळी-कोळीवाडा विभाग मुंबईच्या जी-साउथ सेक्शनमध्ये आहे. बहुतांश कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांची नोंद या वरळी कोळीवाडा विभागातून करण्यात आली होती. त्यामुळे हा संपूर्ण परिसर गतवर्षी एप्रिल 2020ला 'रेड झोन' मध्ये होता. यावर्षी 7 जुनपासून वरळी कोळीवाडा आणि जीजामाता नगरमध्ये एकाही नव्या कोरोना रुग्णाचे निदान झालेले नाही. या परिसरातील फक्त 1 कोरोना पॅाझिटिव्ह रुग्ण उपचाराधीन आहे.

worli koliwada
Break the Chain: मुंबईचा अखेर पहिल्या स्तरात समावेश

नेहमीच गजबजलेला आणि माणसांची वर्दळ असलेल्या या भागातून आत्तापर्यंत 1099 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. 70 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर 1027 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत' अशी माहिती मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

'वरळीच्या 'NSCI डोम' आणि 'पोद्दार हॅास्पिटल' कोरोना केंद्रात रिक्त बेड्स उपलब्ध आहेत. वरळी-कोळीवाड परिसराबाहेरील रुग्णांनाही 'NSCI डोम' कोरोना केंद्रात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. वरळाकोळीवाड्यात जास्तीत जास्त लसीकरण मोहिम राबवण्यावर आम्ही लध केंद्रीत करणार आहोत. वरळी कोळीवाडा परिसरात उच्चभ्रू हॅास्पिटल्सची सुविधा नसतानाही,येथील रुग्णांना महापालिकेकडून उत्तम दर्जाचे उपचार देण्यात आले'.अशी महिती मुंबई जी-साउथ विभागाचे महापालिका अतिरिक्त आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.

तसंच राज्याचे पर्यटन मंत्री व स्थानिक आमदार आदित्य ठाकरे म्हणालेत, वरळी कोळीवाड्यात आठवड्याभरापासून एकही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाहीये, यावरुन नागरिकांचा निर्धार आणि पालिका प्रशासन काय करु शकतं, ते दिसून आलय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com