मुंबईतील मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज झाला कमी

72 टक्के मशिदीवरील भोग्यांचा आवाज कमी
Loudspeaker
Loudspeakere sakal

मुंबई : मशीदीवरील भोंगे काढण्याच्या मनसेच्या मागणीवर राज्यात धुमशान सुरु असताना, मुंबईतील 72 टक्के मशिदीवरील भोग्यांचा आवाज कमी झाल्याचे समोर आले आहे.विषेशता सकाळच्या नमाजासाठीचा अजान अनेक मशीदीनी बंद केल्याचे आढळून आले, तर काही मशीदींनी भोंग्याचा आवाज कमी केला आहे. मुंबई पोलिसांनी यासाठी एक सर्वेक्षण केले होते. त्यातून ही बाब पुढे आल्याचे सुत्रांनी सांगीतले.

गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी सर्व समाजातील नेत्यांची एक बैठक घेतली होती. मुंबई पोलिस मुख्यालयात झालेल्या या बैठकीत मुंबईतील सर्व मौलाना, विश्व हिदू परिषद, बजरंग दलाच्या नेत्यासोबत इतर नेते सहभागी झाले होते. या बैठकीत धार्मिक स्थळावरच्या आवाजासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्व आणि नियमांचे पालन करा, हे समजून सांगण्यात आले होते. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले.या बैठकीनंतर मुंबईतील मशीदीवरील भोग्यांच्या आवाजाची तिव्रता कमी झाल्याचे प्रकर्षाने जाणवल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

यापुढे धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी दिली जाणारी परवानही ही नियमावलीच्या अधीन राहून दिली जाईल, म्हणजे सायलेंट झोनचे नियम काटेकोरपणे पाळावे लागेल असही पोलिसांनी या बैठकीत स्पष्ट केले. नव्या निमयावलीप्रमाणे आता परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरुवात झाल्याचे पोलिसांनी सांगीतले.

नियमांचे पालन करावे लागेल

मशीदीवरील भोंगे उतरवण्याच्या मनसेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलिस पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन कऱण्याचे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांना दिले. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत पुर्वपरवानगीसह लाऊडस्पीकर वाजवायला परवानगी मिळेल. मात्र त्यांना सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या नियमाचे पालन करावे लागेल. शिवाय राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने निश्चित केलेल्या आवाज प्रदूषणाचे नियमावली पाळावी लागेल असही रजनशी सेठ यांनी स्पष्ट केले.

भोंगे, काय आहे नियमावली

  • निवासी भागात 55 डेसिबल आवाज असावा

  • व्यावसायिक क्षेत्रात 60-65 डेसिबल आवाजाची मर्यादा

  • औद्योगिक क्षेत्रात 75 डेसिबलपेक्षा आवाजाला परवानगी नाही़

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com