Mumbai News | रविवारीही ध्वनिप्रदूषणातून सुटका; बांधकाम बंद ठेवण्याचे आयुक्तांचे संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्त संजय पांडे

मुंबई : रविवारीही ध्वनिप्रदूषणातून सुटका; बांधकाम बंद ठेवण्याचे आयुक्तांचे संकेत

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील वाढते ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी पावले उचलली आहेत. ध्वनिप्रदूषणाची कारणे शोधून त्यांनी त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांनी रात्री दहा ते सकाळी सहादरम्यान बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता रविवारचा दिवस ध्वनिप्रदूषणमुक्त ठेवण्याचे ध्येय आहे, अशी माहिती पांडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पांडे यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर नाॅईस अंडर कंट्रोल मोहीम आखण्यात आली असून त्यात रात्री दहा ते सकाळी सहादरम्यान बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. आता रविवारचा दिवस ध्वनिप्रदूषणमुक्त ठेवण्याचे ध्येय आहे. रविवारी बांधकाम बंद ठेवण्याचा विचार आहे, अशी माहिती पांडे यांनी दिली आहे.

शहर आणि उपनगरांत अनेक रस्त्यांच्या कडेला व पुलाच्या खाली भंगार अवस्थेत वाहने पडून असतात. त्यासंदर्भातही अनेक नागरिकांनी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत मुंबई पोलिस आणि पालिकेसह ‘रिमूव्ह खटारा मोहीम’ राबवण्यात आली. त्यानुसार सोमवारी (ता. २१) २७३ भंगार वाहने हटविण्यात आली, अशी माहितीही पांडे यांनी ट्विटरद्वारे दिली.

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार सोमवारी (ता. २१) मुंबई पोलिसांनी १७६ जणांवर कारवाई केली.

Web Title: Noise Pollution Mumbai Sanjay Pandey Signal Stop Construction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top