चांगली बातमी! तीन आठवड्यातच मुंबईतल्या 'या' भागात कोरोना नियंत्रणात

पूजा विचारे
Friday, 10 July 2020

मुंबईतल्या आर आणि पी वॉर्डमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई- सध्या कोरोना व्हायरसनं थैमानं घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय.  मुंबईत शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे कोरोनाची संख्या वाढत चालली असताना दुसरीकडे एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या आर आणि पी वॉर्डमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. फक्त तीन आठवड्यात ही लक्षणीय घट दिसून आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

धारावी आणि वरळीनंतर मालाड, कांदीवली, जोगेश्वरी, बोरिवली हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. या भागातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी करणं हे मोठं आव्हान पालिकेसमोर होतं. दरम्यान आता या भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. मुंबईच्या वायव्य भागात आर (उत्तर, दक्षिण, मध्य) आणि पी (उत्तर, दक्षिण) प्रभागांचा समावेश येतो. या भागात आता  नवीन कोविड-१९ प्रकरणांच्या दैनंदिन संख्येत लक्षणीय घट झाल्याचे बीएमसी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं. आर उत्तर प्रभागात दहिसरचा समावेश आहे, तर आर सेंट्रलमध्ये बोरिवली, आर दक्षिण कांदिवली, पी उत्तर मालाड आणि पी दक्षिण गोरेगाव यांचा समावेश आहे. या भागातील एकत्रित लोकसंख्या सुमारे 30 लाख आहे.

अधिक वाचा- गृहनिर्माण संस्थांच्या ऑडिटसाठी सहकारी फेडरेशनचे थेट उपमुख्यमंत्र्यांना साकडे

अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगर) सुरेश काकाणी म्हणाले, आम्ही या भागातील कोरोना नियंत्रणात आणण्याच्या मार्गावर आहोत. पुढच्या चार ते पाच दिवसांत आम्हाला  पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसेल. 

ते म्हणाले की, आर साऊथ वॉर्डमध्ये तीन आठवड्यांपूर्वी दिवसाला ११४ च्या रुग्ण आढळून यायचे आणि आता हा आकडा  ७० वर पोहोचला आहे. आर सेंट्रल भागातसुद्धा ११६ च्या आकड्यावरुन दिवसाला सुमारे ७० नवीन प्रकरणे आढळतात. आणि आर उत्तरमध्ये दररोज सुमारे २५ नवीन प्रकरणे सापडतात, याआधी हा आकडा ५३ होता. पी दक्षिण वॉर्डातही अशीच परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.  जिथे १३० चा आकडा कमी होऊन दिवसाला १०० नवे रुग्ण आढळून येतात. 

काकाणी म्हणाले, सुमारे तीन आठवड्यांपूर्वी पश्चिम उपनगरातील परिस्थिती अत्यंत भीषण होती. तसंच गेल्या तीन आठवड्यात त्यांनी या भागातील अनेक ठिकाणी जाऊन भेट दिली होती. पालिका आयुक्त एस चहल यांनी याच काळात एकदा पश्चिम उपनगराला भेट दिली.

अधिक वाचा- कोरोनाच्या संकटात पालिकेसोबत हातमिळवणी करा, मुख्यमंत्र्यांनी कोणाकडे मागितली मदत 
 

आर उत्तर, आर मध्य आणि आर दक्षिण प्रभागांवर देखरेख करणारे  पालिका उपायुक्त व्ही. व्ही. व्ही. शंकरवार म्हणाले की,  डोअर-टू-डोअर स्क्रिनिंगमुळे ही सुधारणा झाली आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय जैन संघटनेने व्हॅन दान केली आणि डॉक्टरांना मदत केली ज्यामुळे आम्ही घरोघरी तपासणी आणि शिबिरे घेऊ शकलो. आम्ही आर दक्षिण मध्ये संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्या सर्वांवर जलद प्रतिजैविक चाचण्या (antigen tests) केल्या. त्यावेळी पॉझिटिव्ह प्रकरणांचा दर फक्त चार टक्के होता. 

उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाल शेट्टी म्हणाले, सर्व गोष्टी नियंत्रणाखाली आहेत. बीएमसीने बरीच चांगली पावले उचलली आहेत आणि पोलिसांनीही चांगली कामगिरी केली आहे.

Northwest Mumbai new Covid-19 cases reduction BMC officials


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Northwest Mumbai new Covid-19 cases reduction BMC officials