'या' तारखांची नोंद करून ठेवा, या तारखांना यावेळी येणार समुद्रात हायटाईड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'या' तारखांची नोंद करून ठेवा, या तारखांना यावेळी येणार समुद्रात हायटाईड

चार महिन्यात 21 वेळा 4.5 मीटर उंचीपेक्षा उसळणार लाटा, पालिकेचा सावधानतेचा इशारा

'या' तारखांची नोंद करून ठेवा, या तारखांना यावेळी येणार समुद्रात हायटाईड

मुंबई - मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून पुढच्या 4 महिन्यात समुद्रात 21 वेळा 4.5 मीटर उंचीपेक्षा लाटा उसळणार आहेत. त्यामुळे, पालिकेने संपूर्ण मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मुंबईत गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली असली तरी अनेक भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतिक्षा सुरू आहे. 23 जून ते 21 सप्टेंबर दरम्यान मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात 21 दिवस हायटाईडचा धोका हवामान खात्याने वर्तवलाय. मुंबई महापालिकेनं हायटाईडच्या दिवसांची यादी जाहीर केलीय. 23 जून ते 21 सप्टेंबर दरम्यान अरबी समुद्रात 4.5 मीटरच्या लाटा उसळतील असं मुंबई महापालिकेनं म्हटलंय. त्यामुळे या दिवशी नागरिकांनी समुद्राजवळ जाऊ नये. पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर समुद्राजवळ जातात. पण या दिवशी मुंबईकरांनी समुद्र किनारी जाण्याचा धोका पत्करू नये. 

सर्वात मोठी बातमी : कोरोनावर आली गोळी, किंमत १०३ रुपये; मुंबईत होणार उत्पादन...
 

या दिवशी उसळणार उंच लाटा

दिवस - तारीख - वेळ - हाईट मीटर

 • मंगळवार 23 जून 2022 दुपारी 1 वाजून 43 मिनिट 4.52 मीटर
 • बुधवार  24 जून 2022 दुपारी 2 वाजून 25 मिनिट 4.51 मीटर
 • शनिवार 04 जुलै 2022 सकाळी 11 वाजून 38 मिनिट 4.57  मीटर
 • रविवार 05 जूलै 2022 दुपारी 12 वाजून 23 मिनिट 4.63 मीटर
 • सोमवार 06 जूलै 2022 दुपारी 1 वाजून 06 मिनिट 4.62 मीटर
 • मंगळवार 07 जूलै 2022 दुपारी 1 वाजून 47 मिनिट 4.54 मीटर
 • मंगळवार 21 जुलै 2022 दुपारी 12 वाजून 43 मिनिट 4.54 मीटर 
 • बुधवार 22 जुलै 2022 दुपारी 1 वाजून 22 मिनिट 4.63 मीटर 
 • गुरूवार 23 जुलै 2022 दुपारी 02 वाजून 03 मिनिट 4.66 मीटर 

MMRDA मध्ये कामगार भरतीला सुरुवात पण अर्जकर्त्यांमध्ये 'या' गोष्टीची कमतरता...

 • शुक्रवार 24 जुलै 2022 दुपारी 2 वाजून 45 मिनिट 4.61 मीटर 
 • बुधवार 19 ऑगस्ट 2022 दुपारी 12 वाजून 17 मिनिट 4.61 मीटर 
 • गुरूवार 20 ऑगस्ट 2022 दुपारी 12 वाजून 55 मिनिट 4.73 मीटर 
 • शुक्रवार 21 ऑगस्ट 2022 दुपारी 1 वाजून 22 मिनिट 4.74 मीटर 
 • शनिवार 22 ऑगस्ट 2022 दुपारी 02 वाजून 14 मिनिट 4.67 मीटर .
 • गुरूवार 17 सप्टेंबर 2022 सकाळी 11 वाजून 47 मिनिट 4.66 मीटर .
 • शुक्रवार 18 सप्टेंबर 2022 दुपारी 12 वाजून 24 मिनिट 4.77 मीटर .
 • शनिवार 19 सप्टेंबर 2022 00 वाजून 45 मिनिट 4.68 मीटर आणि 1 वाजून 01 मिनिट 4.76 मीटर . 
 • रविवार 20 सप्टेंबर 2022 दुपारी 01 वाजून 29 मिनिट 4.76 मीटर आणि दुपारी 01वाजून 40 मिनिट 4.62 मीटर 
 • सोमवार 21 सप्टेंबर 2022 दुपारी 02 वाजून 15 मिनिट 4.68 मीटर .

note these dates these are dates of high time very important for mumbaikars

loading image
go to top