Corona : अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या कल्याणमधील रुग्णालयाला पालिकेची नोटीस

सुचिता करमळकर
Monday, 10 August 2020

कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सरकारने निश्‍चित केलेल्या दरापेक्षा जादा आकारणी केल्याचे आढळले आहे.

कल्याण  : कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी वापरण्यात आलेल्या पीपीई किटचे तब्बल पन्नास हजारांचे बिल देणाऱ्या कल्याणमधील श्रीदेवी रुग्णालयाला महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पालिकेच्या दप्तरी असलेली रुग्णालयाची नोंदणी रद्द का करू नये, असा प्रश्‍नही यात विचारण्यात आला आहे. 

अधिक वाचाः  आयर्लंड-दिल्ली- मुंबई! Facebookच्या एका फोनमुळे वाचला तरुणाचा जीव

श्रीदेवी रुग्णालयाने कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सरकारने निश्‍चित केलेल्या दरापेक्षा जादा आकारणी केल्याचे आढळले आहे. रुग्णास जादा रकमेचे बिल देणे, वाढीव रक्कम देण्यासाठी रुग्णाची अडवणूक करून त्यांना डिस्चार्ज न देणे, निश्‍चित करण्यात आलेल्या दरांचे दरपत्रक न लावणे, 80 टक्के आणि 20 टक्के बेडची स्वतंत्र नोंद न करणे, भरारी पथकास बिल तपासणीसाठी उपलब्ध करून न देणे, या कारणांसाठी श्रीदेवी रुग्णालयाला पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

हेही वाचाः  राजकारणातील मोठी बातमी, NCPचे 12 आमदार भाजपमध्ये? मोठ्या नेत्यानं केला खुलासा

दरम्यान, मुख्य लेखा अधिकारी सत्यवान उबाळे यांच्या नियंत्रणाखाली विनय कुलकर्णी यांच्या भरारी पथकाने कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील 15 रुग्णालयांना आतापर्यंत नोटिसा बजावून 31 लाख 45 हजार इतकी रक्कम परत मिळवली आहे. यातील 16 लाख रुपयांची वसुली करून ती संबंधित रुग्णांना परत करण्यात आली आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

notice to a private hospital in Kalyan for high cost charge by patient


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: notice to a private hospital in Kalyan for high cost charge by patient