Corona Updates:अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही घरात 7 दिवस क्वारंटाईन बंधनकारक

Corona Updates:अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही घरात 7 दिवस क्वारंटाईन बंधनकारक

मुंबई: ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार समोर आल्यानंतर राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने कोरोनाला हरवण्यासाठी लढा तीव्र केला आहे. युके, मिडील इस्ट आणि युरोप या देशांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस क्वारंटाईन केले जाणार आहे.

त्यानंतर कोरोनाची आरटीपीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली असून चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. तरीही पुढील 7 दिवस घरातच क्वारंटाईन राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबाबतचे परिपत्रक मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काढले आहे. दरम्यान, विविध देशांच्या दुतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना वंदे भारत मिशन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल असे आयुक्तांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा नवीन प्रकार समोर येताच राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने सावध भूमिका घेत इंग्लड मधून येणारी विमान सेवा 23 डिसेंबर ते 5 जानेवारी 2021 पर्यंत बंद केली आहे. तसेच युके, साऊथ अफ्रिका, आखाती देश (मिडील इस्ट) आणि युरोपियन देशातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुंबईतील विविध हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

7 दिवसांनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला तर पुढील उपचारासाठी सेव्हन हिल्स आणि जीटी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. मात्र 7 दिवसांनी कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तरी पुढील 7 दिवस होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक करण्यात आल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.

-------------------

(संपादन- पूजा विचारे)

Now 7 days quarantine is mandatory home even after 7 days report negative

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com