मुंबईकरांनो सावधान! कोरोना पाठोपाठ आता मलेरियाचा धोका; जुन महिन्यातच आढळले तब्बल 'इतके' रुग्ण

malaria insect
malaria insect

मुंबई : कोरोनापाठोपाठ मुंबईकरांना आता पावसाळी आजारांना सामोरे जावे लागणार आहे. मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, कावीळ हे आजार पावसाळ्यात झपाट्याने पसरतात. जुन महिन्यातच मलेरीयाचे तब्बल 328 रुग्ण आढळल्याने जीवघेण्या कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या मुंबईकरांच्या समोर आता मलेरियाचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, लेप्टो आणि डेंग्यू हे आजारही डोकेवर काढू लागले असून आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. 

मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनीया, लेप्टो, कावीळ साथीचे हे आजार पावसाळ्यात झपाट्याने पसरतात. कोरोना विरोधातील लढ्यात आरोग्य यंत्रणा आधीच रात्रंदिवस कामाला लागली आहे. त्यात साथीचे आजार पसरण्यास सुरुवात झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. जुन 2019 मध्ये मलेरियाचे 313 रुग्ण आढळले होते. तर, यंदा जुन 2020 मध्ये हा आकडा वाढला असून 328 रुग्ण मलेरियाचे आढळले आहेत. तर, डेंग्यूचे 4, तर लेप्टोचा एक रुग्ण आढळल्याने कोरोना पाठोपाठ आता साथीच्या विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोना विरोधात लढा देत असताना आता पावसाळी आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नाॅन कोविड रुग्णालये, दवाखाने, प्रसुतीगृह, हेल्थ पोस्ट सज्ज ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक वाडाॅतील दोन ते तीन दवाखाने, प्रसुतीगृह, हेल्थ पोस्ट या ठिकाणी मलेरिया, डेंग्यू, हिवताप, अतिसार, कावीळ, लेप्टो अशा विविध आजारांवर वेळीच उपचार करण्यात येत आहेत. पावसाळ्यात उद्भवणारे हे आजार लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आल्याचे पालिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. 

दरम्यान, कोरोना विषाणू बरोबर साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्याचे आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्ती स्थानांचा शोध घेतला जात असून ती नष्ट करण्यात येत आहेत. 

"मलेरिया आणि डेंग्यू साठी कीटकनाशक विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. कीटकनाशक विभाग कार्यरत करण्यात आले आहे जे घरोघरी जाऊन तापाच्या चाचण्या घेत आहेत", असे महानगरपालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी म्हंटलंय.

वर्ष - मलेरिया रुग्ण:

-- जुन 2020 - 328
-- जुन 2019 - 313

वर्ष - डेंग्यू रुग्ण:


 -- जुन 2020 - 4
-- जुन 2019 - 8

वर्ष - लेप्टो:
 
जुन 2020 - 1
जुन 2019 - 5

संपादन : अथर्व महांकाळ 

now malaria is spreading all over mumbai read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com