डबेवाल्यांच्या रेल्वे प्रवासाचा मार्ग मोकळा, लोकलनं प्रवास करता येणार

मिलिंद तांबे
Wednesday, 7 October 2020

अथक प्रयत्नानंतर अखेर रेल्वेने मुंबईच्या डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिल्याने डबेवाल्यांची सेवा आता सुरू होणार आहे. मुंबई रेल्वे मंडळाने पत्रक काढून डबेवाल्यांना आपल्या ओळखपत्रावर प्रवास करता येणार आहे.

मुंबई: अथक प्रयत्नानंतर अखेर रेल्वेने मुंबईच्या डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिल्याने डबेवाल्यांची सेवा आता सुरू होणार आहे. मुंबई रेल्वे मंडळाने पत्रक काढून डबेवाल्यांना आपल्या ओळखपत्रावर प्रवास करता येणार आहे.

लॉकडाऊनचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांना मोठ्या प्रमाणात बसला. गेल्या सहा महिने रेल्वे सेवा बंद असल्याने डबेवाल्यांची सेवा ही कोलमडली. आर्थिक चणचण वाढल्याने अनेक डबेवाल्यांची उपासमार होऊ लागली. त्यामुळे डबेवाल्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून लोकलने प्रवास करून देण्याची मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली होती.

अधिक वाचाः  महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या, नीलम गोऱ्हे यांची मागणी

राज्य सरकारने शिफारस केल्यानंतर रेल्वेने राज्य सरकारची विनंती मान्य करत डबेवाल्यांना रेल्वेने प्रवास करू देण्याचे मान्य केले. मात्र त्यासाठी आवश्यक क्युआर कोड नसल्याने डबेवाल्यांना रेल्वेने प्रवास सुरू करता करता आला नाही. 

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अखेर मंगळवारी मुंबई रेल्वे मंडळाने पत्र काढून डबेवाल्यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला. इतकेच नाही तर अनेक डबेवाल्यांकडे अॅन्ड्रॉईड मोबाईल फोन नसल्याने त्यांना ओळखपत्रावर प्रवास करू देण्याची परवानगी ही देण्यात आली आहे. त्याबद्दल मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्याकडून राज्य सरकार तसेच रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Now Mumbai Dabewala can travel by Mumbai local train


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Mumbai Dabewala can travel by Mumbai local train