हिंदमातासाठी आता नवा प्रयोग; पाणी वाहून जाण्यासाठी बोगद्याचा विचार, वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदमातासाठी आता नवा प्रयोग; पाणी वाहून जाण्यासाठी बोगद्याचा विचार, वाचा सविस्तर

दरवर्षी मुसळधार पाऊस होताच पाण्यात जाणाऱ्या हिंदमाता परिसराचे हे संकट अजून पुढील काही वर्षे तरी कायम राहणार, असे दिसत आहे.

हिंदमातासाठी आता नवा प्रयोग; पाणी वाहून जाण्यासाठी बोगद्याचा विचार, वाचा सविस्तरमुंबई : दरवर्षी मुसळधार पाऊस होताच पाण्यात जाणाऱ्या हिंदमाता परिसराचे हे संकट अजून पुढील काही वर्षे तरी कायम राहणार, असे दिसत आहे. येथील पर्जन्य वाहीन्याचे काम 90 टक्के पुर्ण झाल्यानंतर या वाहिन्यांमध्ये भुमिगत सुविधांचे अडथळे असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आता जमिनीच्या 25 मीटरखालून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बोगदा तयार करण्याचा विचार महापालिका करत आहे. 

मुंबईत रुग्णवाढीची गती मंदावली; गेल्या 24 तासात 925 रुग्णांची भर; तर इतक्या रुग्णांचा मृत्यू

हिंदमातापासून परळपर्यंत पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रे रोड येथे 100 कोटी रुपये खर्च करुन पंपिंग स्टेशन बांधण्यात आले. त्यानंतर तीन वर्षांपुर्वी येथील भुमिगत पर्जन्यवाहिन्यांची क्षमता वाढवण्यास सुरवात झाली. हे काम 90 टक्के झाले असून पुढील पावसाळ्यापर्यंत पुर्ण होणार होते. मात्र, 5 ऑगस्टरोजी झालेल्या पावसात या वाहिनीच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. 

नवी वाहीनी जमिनीखाली 6 मीटरवर असून 2.2 मिटर व्यासाची आहे. मात्र, यात जलवाहीन्या तसेच इतर वाहिन्यांमुळे या पर्जन्य वाहिनीची क्षमता 40 टक्क्यांनी कमी झाली आहे. ही वाहीनी 2.2 मिटर क्षमतेची असली तरी प्रत्यक्षात 1.7 मिटरच्या व्यासातूनच पाणी वाहून जात आहे. त्यामुळे पाण्याचा अपेक्षेप्रमाणे निचरा होत नाही.

'सोनियाची उगवली सकाळ' या प्रसिद्ध गाण्याचे गीतकार मधुकर घुसळे यांचे निधन

पंपिंग स्टेशनही बांधावे लागणार
महापालिका पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आता जमिनीच्या 25 मीटर खालून बोगदा तयार करण्याच्या विचारात आहे. सुमारे 2.2 मिटर व्यासाचा हा जलबोगदा असेल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.  यासाठी 25 मीटरखालून पाण्याचा उपसा करण्यासाठी मिनी पंपिंग स्टेशनही बांधावे लागेल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )