ऑनलाईन गेम खेळता? सावध व्हा, फसव्या जाहिरातीविरोधातल्या तक्रारीत वाढ

ऑनलाईन गेम खेळता? सावध व्हा, फसव्या जाहिरातीविरोधातल्या तक्रारीत वाढ

मुंबई: गेल्या काही महिन्यात ऑनलाईन रिअर मनी गेमिंग हा मोठा उद्योग म्हणून पुढे आला आहे. प्रत्यक्ष पैशाचा सहभाग असलेल्या ऑनलाइन गेम्सच्या जाहिरातींबद्दलच्या अनेक तक्रारीदेखील समोर येत आहेत. या फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी दि अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्डस् कौन्सिल ऑफ इंडियाने अर्थात एएससीआयने या संबधी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली होती. गेल्या सात आठवड्याच्या काळात या संबधी 81 जाहिराती विरोधातील तक्रारी एएससीआयकडे आल्यात. यातील सुमारे 75 टक्के तक्रारी या शेवटच्या ग्राहकांकडून (एण्ड कंझ्युमर) आलेल्या होत्या. तर उर्वरित एएससीआयने स्वयंस्फूर्तीने घेतल्या होत्या.

यापैकी 15 प्रकरणांमध्ये एएससीआयचे पत्र प्राप्त झाल्यानंतर जाहिरातदारांनी स्वेच्छेने जाहिराती मागे घेतल्या. अन्य 27 प्रकरणांमध्ये जाहिरातदारांनी तक्रार दाखल झाल्यानंतर पण एएससीआयचे पत्र मिळण्यापूर्वीच जाहिराती काढून घेतल्या होत्या. तर 2 प्रकरणांमध्ये जाहिरातदारांनी तक्रारीला आव्हान दिले. पण या जाहिराती नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत असा निष्कर्ष एएससीआयने काढला आहे. 37 जाहिराती विरोधातील तक्रारी सध्या प्रक्रियाधीन आहेत. त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

इन्स्टाग्रामवरील जाहिरातीविरोधात जास्त तक्रारी

सर्वाधिक तक्रारी इन्स्टाग्रामवरील (39) जाहिरातींबाबत होत्या. तर त्याखालोखाल यूट्यूबवरील जाहिरातींबाबत 37 तक्रारी होत्या. गेम्सच्या प्रकारांचा विचार करता, क्रिकेटविषयक जाहिरातींबाबत  55, तर रमीच्या जाहिरातींच्या 15 तक्रारी होत्या. 

काय आहे मार्गदर्शक तत्वे
जाहिरातदारांनी अल्पवयीन वापरकर्त्यांना लक्ष्य करू नये
गेम्सना उपजीविकेचा संभाव्य स्रोत म्हणून सादर करू नये 
गेम्सचा संबंध यशाशी जोडू नये.
सर्व जाहिरातींमध्ये आर्थिक नुकसानीचा धोका तसेच या गेम्सच्या आहारी जाण्याचा धोका यांबद्दल अस्वीकृतीचा (डिसक्लेमर) समावेश 

या आमच्या सहयोगींच्या माध्यमातून, या जाहिरातींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. या सहयोगामुळे आम्ही डिजिटल क्षेत्रावर अधिक कार्यक्षमतेने लक्ष ठेवू शकत आहोत. या उपायांमुळे प्रत्यक्ष पैसे जिंकून देणा-या ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती अधिक पारदर्शक व ग्राहकांसाठी सुरक्षित होतील, अशी आशा आम्हाला वाटते.”
मनिषा कपूर, एएससीआयच्या महासचिव

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Number of complaints advertisements for online games involving real money

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com