esakal | राज्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणारे जास्त; दिवसभरात 3039 रुग्ण ठणठणीत 
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणारे जास्त; दिवसभरात 3039 रुग्ण ठणठणीत 

राज्यात आज 2910 कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 19,87,678 झाली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांचा एकूण आकडा 51,965 वर पोहचला आहे. 

राज्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणारे जास्त; दिवसभरात 3039 रुग्ण ठणठणीत 

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई  : राज्यात आज 2910 कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 19,87,678 झाली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांचा एकूण आकडा 51,965 वर पोहचला आहे. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 

राज्यात दिवसभरात 3039 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 18,84,127 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचा दर 94.79 टक्के आहे. आज राज्यात 52 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, एकूण मृतांचा आकडा 50,388 झाला आहे. राज्यात मृतांचा दैनंदिन आकडा वाढत असल्याने मृत्युदर 2.54 झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये ठाणे परिमंडळ 12, पुणे 12, नाशिक सहा, कोल्हापूर तीन, औरंगाबाद शून्य, लातूर मंडळ पाच, अकोला मंडळ तीन, नागपूर नऊ व इतर राज्य दोन येथील मृत्यूंचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या 52 मृत्यूंपैकी 29 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत, तर नऊ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 14 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. 

 The number of corona patients is declining in the state

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image